Maharashtra Breaking News LIVE : रात्री 12 वाजता लालबागच्या राजाचा दर्शनाला सुरुवात होणार
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

गणेशोत्सवनिमित्त अनेक कोकणवासीय गावी जात आहेत. कोकणवासियांना लांब पल्ल्याच्या रेल्वेचा फटका बसतोय. मडगाव- मांडवी एक्स्प्रेस एक तास उशिराने धावत आहे. तर ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. तर यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांसाठी मेट्रो हा मोठा दिलासा ठरणार आहे. शहरातील प्रमुख गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येतून सुटका मिळणार आहे. शहराबाहेरून येणारे नागरिक स्वारगेट, शिवाजीनगर, डेक्कनसारख्या वर्दळीच्या ठिकाणी गाड्या पार्क करून मेट्रोने सहजपणे मध्यवस्तीपर्यंत जाऊ शकतील. यामुळे पायी चालत जाण्याचा त्रास टळणार असून गर्दीतही सोयीस्कररीत्या देखावे पाहणे शक्य होणार आहे. गणेशभक्तांसाठी मेट्रोमुळे प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यातील मराठा समाजाकडून मुंबईला जाण्याची तयारी
पुण्यातील मराठा समाजाकडून मुंबईला जाण्याची तयारी
पुण्यातील मराठा समाज परवा चाकणला एकत्र येणार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने रवाना होणार
पुण्यातील 3 हजार स्वयंसेवकांचे आयडेंटी कार्ड तयार, मराठा समाजातील कार्यकर्त्यांची माहिती
-
नाशिकच्या राजाचा मुखदर्शन सोहळा, पोलीस आयुक्तांची उपस्थिती
नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह
नाशिकच्या राजाचा मुखदर्शन सोहळा
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लावली मुखदर्शन सोहळ्याला हजेरी
उद्या होणार लाडक्या बाप्पाचं आगमन
-
-
कृत्रिम फुलांच्या वापरास प्रतिबंध घाला, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पंकजा मुंडेंना पत्र
कृत्रिम फुलांच्या वापरास कायदेशीर प्रतिबंध घालण्याची मागणी
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना पत्र
कृत्रिम फुलांच्या वापरामुळे फुल शेती धोक्यात होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
शेतकरी हितास्तव पर्यावरण विभागाकडून कायदेशीर उपाययोजना करण्याची पर्यावरण मंत्र्यांना विनंती
-
संघाला तथ्यांच्या आधारे ओळखले पाहिजे, धारणांच्या आधारे नाही – मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलची चर्चा वस्तुस्थितीवर आधारित असली पाहिजे, धारणांवर नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ‘संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाची: नवीन क्षितिजे’ या विषयावरील संवादादरम्यान भागवत म्हणाले की, संघाबद्दल चर्चा सतत होत राहते. संघावर जी काही चर्चा होते ती वस्तुस्थितीवर आधारित असली पाहिजे, धारणांवर नाही.
-
जम्मू आणि काश्मीर: अर्धकुंभवारी येथील इंद्रप्रस्थ रेस्टॉरंटजवळ भूस्खलन
जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकड्यांवर असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी भूस्खलन झाले. अर्धकुंभवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ ही भूस्खलनाची घटना घडली, ज्यामध्ये काही लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.
-
-
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत पुन्हा एक बैठक होणार
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत पुन्हा एक बैठक होणार आहे. येत्या दोन दिवसात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. वेळ पडल्यास मराठा आरक्षणासंदर्भातली उपसमिती जरांगे यांची भेट घेईल. दुसरीकडे, मनोज जरांगे मुंबईत येऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत. यावेळीही जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. बैठकीबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेणार आहेत.
-
जम्मू-काश्मीर: झोजिला येथे भूस्खलनामुळे श्रीनगर-लडाख महामार्ग बंद
जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन होत आहे. नद्या वाहत आहेत आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान, झोजिला येथे भूस्खलन झाल्यामुळे श्रीनगर-लडाख महामार्ग बंद करण्यात आला आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
-
जरांगेंच्या मराठा आरक्षणाबाबत कुठलंही वक्तव्य करू नका , एकनाथ शिंदे यांच्या सूचना- सूत्र
जरांगेंच्या मराठा आरक्षणाबाबत कुठलंही वक्तव्य करू नका , अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी सहकारी मंत्र्यांना आणि आमदारांना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जरांगेंचा विषय सरकार आपल्या पद्धतीने हाताळेल, त्यावर बोलून टिकेचे धनी होऊ नका; असंही सांगितल्याचं बोललं जात आहे. जरांगे पाटील ज्या ज्या आमदारांच्या मतदार संघातून जातील त्यात योग्य ती भूमिका घ्या , अशाही मंत्र्यांना आणि आमदारांना सूचना केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
डोंबिवलीतील गणपती मूर्तिकार फरार प्रकरण, फसवणुकीचा गुन्हा दाखल
डोंबिवलीतील गणपती मूर्तिकार फरार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. डोंबिवली महात्मा फुले रोडवरील आनंदी कला केंद्रच्या मूर्तिकार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल तांबडे असे या मूर्तीकारचं नाव आहे. पोलीस सध्या तांबडेचा शोध घेत आहे.
-
लालबागच्या राजाच्या महाप्रसादाला मुंबई पोलीस-महापालिकेचा विरोध, कारण काय?
लालबागचा राजा आणि अंबानी कुटुंबियांकडून रोज 1 लाख भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार होता. मात्र यासाठी मुंबई पोलीस-महापालिकेने विरोध दर्शवला आहे. गणेशोत्सवादरम्यान लालबागनगरीत वाढलेली गर्दी लक्षात घेता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या भक्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
-
दोन गटातील राड्यानंतर धाराशिवच्या मोहा गावाला छावणीचे स्वरूप, शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज फाटा तैनात
धाराशिवच्या मोहा गावात दोन गटात राडा झाला. या राड्यानंतर गावाला छावणीचे स्वरूप आलं आहे.गावात शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. गावात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आला आहे. गावात 2 गटात स्मशानभूमीच्या जागेच्या वादावरून राडा झाला होता. दगडफेकीत पोलिसांसह आठ ते दहा लोक जखमी झाले.
-
गडचिरोली जिल्ह्यात कुत्रे आणि माकडांचा हैदोस
गडचिरोली जिल्ह्यात कुत्र्यांनी आणि माकडांनी हैदोस घातला आहे. राष्ट्रीय महामार्गासह छोट्या गावातील रस्त्यांमध्ये कुत्र्यांचे साम्राज्य दिसत आहेत. कुत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 114 नागरिकांना चावा घेतला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिक बाहेर निघण्यास घाबरत आहेत. तेलंगाना राज्यातून वनविभागाने आणून सोडलेले माकड मोठ्या प्रमाणात हैदोस घालत आहेत. अनेक घरांवर आणि रस्त्यांवर माकडांचे साम्राज्य आहे. वन विभागाने या माकडांचाा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
-
पुण्यातील मंडई परिसरात पुणेकरांची मोठी गर्दी
गणेशोत्सवाला अवघे काही तास उरले असताना पुणे शहरातील मुख्य पेठांमध्ये पुणेकरांनी तुडुंब गर्दी केली आहे.
-
गोंदिया जिल्ह्यात पावसाने घेतली एन्ट्री
गणपतीच्या आगमनाआधी गोंदिया जिल्ह्यात पावसाने घेतली एन्ट्री घेतली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला असून नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली आहे.
-
जरांगे यांच्या लढ्यात सहभागी होणे प्रत्येकाचे कर्तव्य – खा. संजय जाधव
जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी उभा केलेला लढ्यात सहभागी होणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे खासदार संजय जाधव यांनी म्हटले आहे.
-
गणेशोत्सव काळात पुणे आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस
गणेशोत्सव काळात पुणे आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
-
जरांगेंनी हायकोर्टाचे नियम मोडले तर ६ महिने तुरुंगात जावं लागेल : गुणरत्न सदावर्ते
मुंबईत जरांगेंना आंदोलन करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवात रहदारी विस्कळीत होऊ नये यासाठी म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव जरांगेंना आंदोन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याबाबत आता सरकारी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंचं आंदोलन मुळत:च चुकीचं असल्याचं सदावर्ते म्हणाले. ” तसेच हायकोर्टाचे नियम मोडले तर जरांगेंना ६ महिने तुरुंगात जावं लागेल” असंही म्हटलं आहे.
-
जळगावात एकनाथ शिंदेंचा स्वीयसहायक असल्याचे सांगून 18 जणांना 55 लाख 60 हजारांचा गंडा
एकनाथ शिंदेंचा स्वीयसहायक असल्याचे सांगून तब्बल 18 जणांना 55 लाख 60 हजारांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक केल्याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या हितेश रमेश संघवी आणि त्याची पत्नी अर्पिता संघवी या दांपत्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी हितेश संघवी याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पत्नी अर्पिता संघवी हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे
-
जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास हायकोर्टाची मनाई
मुंबईत जरांगेंना आंदोलन करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवात रहदारी विस्कळीत होऊ नये यासाठी म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव जरांगेंना आंदोन करण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईच्या बाहेर मात्र आंदोलन करण्यास परवानगी असल्याचंही म्हटलं आहे.
-
बिवलकरांना दिलेल्या नवी मुंबईतील भुखंडाची रोहित पवारांकडून पाहणी
बिवलकरांना दिलेल्या नवी मुंबईतील भुखंडाची रोहित पवारांकडून पाहणी करण्यात आली आहे. शिरसाटांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. ते म्हणाले की, “४८ तासांत टेबलवर फाईल येते आणि त्यांना भुखंड दिला जातो. आम्ही १२ हजार पानांचे पुरावे सादर केले आहेत. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना अजूनही शिक्षा नाही.”असं म्हणत रोहित पवारांनी शिरसाटांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे
-
मनोज जरांगे उद्या सकाळी 10 वाजता मुंबईला येण्यासाठी निघणार
मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. उद्या सकाळी 10 वाजता मुंबईला येण्यासाठी निघणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने त्यांची भेट घेतली. गणेशोत्सव असल्याने आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली.
-
खडकी बामणीजवळ कंटेनर पुलाखाली कोसळला
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर खडकी बामणीजवळ कंटेनर पुलाखाली कोसळला. दोन पुलांच्या मधल्या गॅपमध्ये ट्रक अडकल्याने मोठा अपघात. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र कंटेनरचे मोठे नुकसान. राष्ट्रीय महामार्ग 53 वर भीषण अपघात. चालक-वाहक सुरक्षित.
-
संजय शिरसाटांनी राजीनामा द्यावा – रोहित पवार
संजय शिरसाटांनी राजीनामा द्यावा. मी लोकांना आवाहन करतो इथे घर घेऊ नका. नवी मुंबईतील भूखंडाची रोहित पवारांकडून पाहणी. आम्ही 12 हजार पानांचे पुरावे सादर केले. भूमिपुत्रांना हक्काची जमीन मिळत नाही. सिडकोने बिवलकरांना दिलेल्या भूखंडाची पाहणी रोहित पवारांनी केली.
-
निफाड साखर कारखान्याचे सभासद व कामगार आक्रमक
निफाड साखर कारखाना विक्री करून नये. कामगारांच्या 81 कोटी 94 लाख थकबाकी व सभासदांची देणी त्वरित द्यावी. यासह एकूण सहा मागण्यासाठी निफाड येथील जळगाव फाटा ते तहसील, प्रांत कार्यलयावर धडक मोर्चा. माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या धडक मोर्चाचे तहसील, प्रांत कार्यलयावर ठिय्या आंदोलन
-
दीड वर्षानंतर खासदार अशोक चव्हाण काँग्रेसच्या व्यासपीठावर
दीड वर्षानंतर खासदार अशोक चव्हाण काँग्रेसच्या नेत्यासोबत व्यासपीठावर. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार अशोक चव्हाण यांच्यात रंगल्या गप्पा.नचव्हाण यांच्या गप्पांमध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती यांचाही सहभाग. स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळा अनावर प्रसंगी अशोक चव्हाण यांची उपस्थिती.
-
वनराज आंदेकर हत्येतील आरोपी सूरज ठोंबरेची पुणे पोलिसांनी काढली धिंड
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्या प्रकरणातील आरोपी सूरज ठोंबरे हा दोन दिवस वडिलांच्या उपचारांसाठी जामिनावर बाहेर आला होता. त्यावेळी पुण्यातल्या झेड ब्रिजजवळ सुमारे पाचशे मुलांना गोळा करून एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्याच्यासोबत अनेक तडीपार गुन्हेगार, टोळीप्रमुखही हजर होते, अशी माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला काल ताब्यात घेतलं व त्याची शहरामधून धिंड काढत बेडूकउड्या मारायला लावल्या.
-
बदल होणार नाही, आम्ही उद्या मुंबईसाठी निघणार – जरांगे मागण्यांवर ठाम
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आले आहेत. मात्र जरांगे त्यांच्या मागण्यांवर ठाम असून कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. उद्या आम्ही सर्वजण मुबईसाछठी निघणारच असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
-
तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत करणार भाजपमध्ये प्रवेश
तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी गणपतीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असं सावंत यांनी सांगितलं. शिवाजी सावंत हे सध्या शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत.
-
डोंबिवलीत आनंदी कला केंद्रात गोंधळ; मूर्तिकार गायब, ग्राहक संतापले
डोंबिवली पश्चिम महात्मा फुले रोडवरील आनंदी कला केंद्रात गोंधळ माजला आहे. मूर्तिकार प्रफुल तांबडे गायब झाल्याने ग्राहकांचा आक्रोश. 3 ते 4 महिन्यांपूर्वी बुक केलेल्या मूर्ती न मिळाल्याने ग्राहक संतापले आहेत. विशेष म्हणजे याबाबत काही ग्राहकांनी काल पोलिसांना माहिती देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने ग्राहकांनी पोलिसांवरही संताप व्यक्त केला आहे.
-
मुख्यमंत्री फडणवीसांचे ओएसडी मनोज जरांगेंच्या भेटीला, मोठा निर्णय होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आंदोलनाची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर साबळे यांनी ही भेट घेतली आहे. या भेटीत मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे.
-
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा संपली, मुख्यमंत्र्यांना दाखवला हिरवा झेंडा
नांदेडकरांची मुंबईला वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. नांदेडहून मुंबईला धावण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. ही गाडी सकाळी ५ वाजता नांदेडहून निघेल. दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. मुंबई ते जालना धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार आता नांदेडपर्यंत करण्यात आला आहे, ज्यामुळे या भागातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
-
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ, आयात शुल्कात पाचपट वाढ
ऐन सणासुदीच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे श्रीलंका सरकारने कांद्याच्या आयात शुल्कात केलेली पाचपट वाढ. आधी १० रुपये प्रति किलो असलेले आयात शुल्क आता थेट ५० रुपये प्रति किलो करण्यात आले आहे. या निर्णयाचा थेट परिणाम भारतातून श्रीलंकेत होणाऱ्या कांदा निर्यातीवर झाला आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची घसरण झाली असून, कांद्याचे भाव सरासरी १२०० ते १३०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. भारतीय कांदा निर्यातीवर केंद्र सरकारकडून कोणतेही निर्बंध नसले तरी, जास्तीत जास्त कांद्याची निर्यात व्हावी यासाठी सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
-
डोंबिवलीत मुर्तीकार गायब, घटनास्थळी तणावाचे वातावरण
डोंबिवली पश्चिममधील महात्मा फुले रोडवर असलेल्या आनंदी कला केंद्रात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठा गोंधळ पाहायला मिळाला. गणपतीच्या मूर्तिकार प्रफुल तांबडे अचानक गायब झाल्याने ज्या ग्राहकांनी दोन-तीन महिन्यांपूर्वीच मूर्ती बुक केल्या होत्या, त्यांची मोठी पंचायत झाली आहे. बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर आले असताना मूर्तिकाराचा फोन बंद असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. या गोंधळाच्या परिस्थितीत, मिळेल ती मूर्ती घेऊन अनेक ग्राहक घरच्या दिशेने निघाल्याचे चित्र आहे, कारण वेळेवर दुसरी मूर्ती मिळणे जवळपास अशक्य आहे. सार्वजनिक मंडळांसाठी असलेल्या अनेक मूर्तींचे काम अपूर्ण आहे आणि त्यांना रंगकामही केलेले नाही, त्यामुळे आयोजकांचीही मोठी अडचण झाली आहे. या गोंधळाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, नागरिक आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
-
पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या विद्यार्थ्यांचे सेट भवन समोर आंदोलन…
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (SET) चा निकाल रखडल्याने १ लाख १० हजार पेक्षा जास्त उमेदवार प्रतीक्षेत आहेत… परीक्षा होऊन दोन महिने उलटले तरी निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे… ऑफलाइन पद्धतीने परीक्षा झाल्यामुळे निकालाला विलंब होत असल्याचा तर्क आहे, तर ‘नेट’ परीक्षेचा अवघ्या २२ दिवसांत निकाल लागला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट चा लवकरच निकाल जाहीर करावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) चे सेट निकाला संदर्भात पुणे विद्यापीठात आंदोलन…
-
– मध्यरात्री धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार
बीडच्या गेवराई जवळ असलेल्या पेंडगाव येथे धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर चालत्या चार-चाकी गाडीने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखल्याने अख्खं कुटुंब या गाडीतून सुखरूप बाहेर पडलं. बराच वेळ ही गाडी जळत होती. संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून शेवटी रस्त्याची देखभाल करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या लोकांनी पोहोचून इतरत्र पांगलेली आग विझवली.
-
रात्री 12 वाजता लालबागच्या राजाचा दर्शनाला सुरुवात होणार
लालबाग – गणेश उत्सवाला अवघे काही तास उरले आहेत आणि लालबागच्या राजाच्या चरण स्पर्श दर्शनासाठी नवसाच्या रांगेत दुपारपासूनच गणेश भक्तांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. रात्री १२ वाजता लालबागच्या राजाचा दर्शनाला सुरुवात होणार आहे मात्र या पूर्वी पासूनच आता भाविकांकडून रांगेत उभा राहण्यास सुरुवात झाली आहे.नवसाची रंग मागच्या बाजूने काळाचौकी पासून परळ पर्यंत पोहचली आहे
-
पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर कारवाई
गणेशोत्सवात अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी झोन 4 पोलिसांनी मोठी कारवाई केली. एकाच दिवसात 42 हातभट्टी/दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात आलेय… त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली असून… ही कारवाई गणेशोत्सव कालावधीत अवैध दारू विक्री रोखण्यासाठी करण्यात आलीय… पोलिसांनी यापुढेही अशा कारवाया तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
-
पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने तगडा पोलीस बंदोबस्त…
पोलीस ,होमगार्ड ,एसआरपीएफ जवानांसह साडेआठ हजार जण तैनात… पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला सुरुवात होत असून लाखो गणेश भक्तांच्या बंदोबस्तासाठी पुणे पोलीस दलाने जय्यत तयारी केली आहे… पोलीस कर्मचारी, होमगार्ड केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या जवानांसह एकूण साडेआठ हजार जणांचा तगडा बंदोबस्त तैनात केल्याची शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती…
-
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अंबारे येथील सीआयएसएफ जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दशरथ शांताराम पाटील या ४१ वर्षीय सीआयएसएफ जवानाला मुंबई येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले होते… खान्देश सुरक्षा रक्षक आणि करणखेडा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वीर जवानाला सलामी देण्यासाठी ३०० फूट तिरंगा रॅली काढली… अंबारे आणि खापरखेडा येथील दोन्ही गावांत घरांसमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. प्रत्येक घरी पार्थिवाची पूजा करण्यात आली. खासदार स्मिता वाघ यांची देखील यावेळी उपस्थिती होती; …..जवानाला निरोप देण्यासाठी अंबारे, खापरखेडा दोन्ही गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
-
जलपर्णी टेंडरमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप…
जलपर्णी काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने टेंडर काढलं . मात्र पावसाळा सुरू झाल्याने ठेकेदाराने तलावातील जलपर्णी काढलीच नाही. ठेकेदाराचा खिसा भरण्याचा काम पुणे महानगरपालिकेचे अधिकारी करत असल्याचा आरोप संघर्ष सेनेचे संस्थापक संतोष साठे यांनी केलाय
-
डोंबिवलीत गणेश भक्तांचा आक्रोश: मूर्तिकार फरार
गणेशोत्सवापूर्वीच ‘आनंदी कलाकेंद्र’चा मूर्तिकार झाला गायब. डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोडवर असलेले आनंदी कलाकेंद्र नावाच्या कारखान्याची घटना. डोंबिवलीकरांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी मूर्ती केली होती बुक. मूर्तिकाराचा फोन बंद, कारखानाही नसल्याने, मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांची निराशा.
-
खडकवासला मधून मुठा नदीमध्ये 8517 क्युसेसने पाण्याचा विसर्ग
पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे परिणामी खडकवासला धरणातून सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून निसर्ग वाढवण्यास सुरुवात करण्यात आली. सध्या मुठा नदी पात्रात 8517 क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे.
-
गणपतीच्या आगमनापूर्वी कल्याणमध्ये फुलांचे भाव गगनाला
बाजारपेठेत प्रचंड गर्दी, पण फुलांचे दर दुप्पट झाल्याने नागरिक हैराण. झेंडू, शेवंती, गुलाब अशा सर्व फुलांच्या किमती वाढल्या.शंभर रुपयांचा झेंडू आता दोनशे रुपयांना, तर शेवंती तीनशे रुपयांपर्यंत पोहोचली. पावसामुळे ओल्या फुलांची मागणी
-
बीड ब्रेक-गेवराईमधील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह 14 लोकांवर गुन्हे दाखल
बीडच्या गेवराईत काल लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. पोलिसांनी सुमोटो नुसार 14 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचाही गुन्ह्यामध्ये सहभाग.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये मिरवणुकांमध्ये लेझर आणि बीम लाइट वापरण्यास बंदी
पिंपरी-चिंचवडमध्ये मिरवणुकांमध्ये लेझर आणि बीम लाईट वापरण्यास बंदी आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद आणि इतर मिरवणुका, कार्यक्रमांदरम्यान प्रखर बीम लाइट आणि लेझर बीम लाईटच्या वापराला प्रतिबंध घालण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. हे आदेश २५ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या कालावधीत लागू राहतील.
-
पिंपरी चिंचवडमधील सराईत तीन आरोपींना अटक
पिंपरी चिंचवडमधील सराईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून 4 पिस्तुल आणि 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाने एका कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 देशी बनावटीच्या पिस्तुल आणि 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
-
यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांसाठी मेट्रो हा मोठा दिलासा
यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांसाठी मेट्रो हा मोठा दिलासा ठरणार आहे. शहरातील प्रमुख गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येतून सुटका मिळणार आहे. शहराबाहेरून येणारे नागरिक स्वारगेट, शिवाजीनगर, डेक्कनसारख्या वर्दळीच्या ठिकाणी गाड्या पार्क करून मेट्रोने सहजपणे मध्यवस्तीपर्यंत जाऊ शकतील. यामुळे पायी चालत जाण्याचा त्रास टळणार असून गर्दीतही सोयीस्कररीत्या देखावे पाहणे शक्य होणार आहे. गणेशभक्तांसाठी मेट्रोमुळे प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-
पुणे विभागात असंसर्गजन्य आजारांवरील तपासणीत चिंताजनक निष्कर्ष समोर
पुणे विभागात असंसर्गजन्य आजारांवरील तपासणीत चिंताजनक निष्कर्ष समोर आले आहेत. फेब्रुवारी ते ऑगस्ट या सहा महिन्यांत 16 लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल 95 हजार रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब आढळला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात 55 हजार, पुण्यात 27 हजार आणि साताऱ्यात 11 हजार रुग्णांचा समावेश आहे. तर, 14 लाख तपासण्यांपैकी 41 हजार नागरिक मधुमेहग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले.
-
मडगाव – मांडवी एक्स्प्रेस उशिराने, कोकणवासियांना फटका
गणेशोत्सवानिमित्त अनेक कोकणवासीय गावी जात आहे. या कोकणवासियांना लांब पल्ल्याच्या रेल्वेचा फटका बसला आहे. मडगाव – मांडवी एक्स्प्रेस एक तास उशिराने धावत आहे. तर ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. 7 वाजून 50 मिनिटांची मांडवी एक्स्प्रेस अजूनदेखील ठाणे स्थानकावर पोहोचली नाही.
-
परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘म्हाडा’चा पुण्यात मोठा प्रकल्प
पुणे जिल्ह्यात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘म्हाडा’ने मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. खेड आणि मुळशी तालुक्यातील सुमारे 57 एकर सरकारी गायरान जमीन जिल्हा प्रशासनाने ‘म्हाडा’कडे सुपूर्द केली आहे. या जमिनीवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत टप्प्याटप्प्याने सुमारे 13 हजार 301 घरे बांधण्यात येणार आहेत.
रोहकल येथे सुमारे आठ हजार तर मुळशीतील नेरे गावात 5 हजारांहून अधिक घरे उभारली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 2194 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील चार वर्षांत घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Published On - Aug 26,2025 8:29 AM
