Maharashtra Breaking News LIVE 7 February 2025 : मुंडेंना भाजपाचं पाठबळ, त्यांचा राजीनामा घ्या- करुणा शर्मा
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 7 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर येणार असून मध्यवर्ती संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत. शिवकालीन वाघनखं बघण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशीही ते चर्चा करणार आहेत. मीरा-भाईंदर शहरास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा शुक्रवारी 24 तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शहरात पुन्हा पाणीटंचाई निर्माण होणार आहे. जळगाव जिल्ह्यात तब्बल 1700 पेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रस्ताव, इस्टिमेट याच प्रक्रिया अद्यापही सुरू असून या सर्वांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया रखडल्यास पाहायला मिळत आहे. यासह देश-विदेशातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचण्यास मिळतील. लेटेस्ट अपडेटसाठी वाचत रहा हा ब्लॉग.
LIVE NEWS & UPDATES
-
नवाब मलिका यांच्या अडचणीत वाढ! वांद्रे कोर्टाने दिले असे आदेश
यास्मिन वानखेडंच्या तक्रारीवर वांद्रे कोर्टाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी याचिका यास्मिन वानखेडे यांनी केली होती. वांद्रे कोर्टाकडून आंबोली पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मलिकांनी बदनामी केल्याचा यास्मिन वानखेडे यांचा आरोप होता. मलिकांचं वक्तव्य, पोस्ट बदनामीकारक असल्याचं निरीक्षण वांद्रे कोर्टाने नोंदवलं आहे.
-
बरेलीमध्ये पतंग बनवण्याच्या कारखान्यात स्फोट, 3 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील बरेली येथे पतंग बनवण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात कारखाना मालकासह तिघांचा मृत्यू झाला. ही माहिती पोलिसांनी दिली आहे.
-
-
पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक
पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला रोहित पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील भेटीला गेले आहेत. सांगली जिल्ह्यासंदर्भात ही बैठक आहे.
-
मुंडेंना भाजपाचं पाठबळ, त्यांचा राजीनामा घ्या- करुणा शर्मा
धनंजय मुंडे यांना भाजपाचं पाठबळ असल्याचा आरोप करुण शर्मा यांनी केला आहे. मुंडेंना पाठबळ देत असाल तर भाजपाचं पुढच्या निवडणुकीत काय खरं नाही, असं ही त्यांनी यावेळी इशारा दिला. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या असं करुणा शर्मा यांनी सांगितलं आहे.
-
निवडणूक आयोग सरकारची गुलामी करत आहे : संजय राऊत
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीवरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
राऊत काय म्हणाले?
“जर या देशातील निवडणूक आयोग जिवंत असेल, तर न निवडणूक आयोगाला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली पाहिजेत. पण निवडणूक आयोग उत्तर देणार नाही. कारण हा आयोग सरकारची गुलामी करत आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे वारंवार जाऊन डोकं आपटलं. पण निवडणूक आयोग मेला आहे”, असं राऊत म्हणाले.
-
-
लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 निवडणुकीदरम्यान 39 लाख मतदार वाढले : राहुल गांधी
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. राज्यात झालेली विधानसभा निवडणूक आणि मतदार यादीतील अनियमिततेच्या मुद्द्यावरुन ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करत अेक मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न केलाय.
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
- आम्हाला मतदार यांद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळल्या
- 5 वर्षात 34 लाख मतदार वाढले
- लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 निवडणुकीदरम्यान 39 लाख मतदार वाढले
- हिमाचल प्रदेशातील लोकसंख्येऐवढे मतदार वाढले
- 5 महिन्यात वाढलेले मतदार कोण आहेत?
- सरकारने निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली
- महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त आहेत
-
आम्ही कुठेच जाणार नाही, सर्वजण पक्षातच : अरविंद सावंत
आम्ही कुठेच जाणार नाही, सर्वजण पक्षातच आहोत. सर्व 9 खासदार उपस्थित आहोत, ही आमची वज्रमूठ आहे”, असं म्हणत अरविंद सांवत यांनी ठाकरे गटाच्या खासदारांची एकी दाखवून दिली आहे. मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंचे खासदार शिवसेनेत येणार असल्याचा दावा केला होता. त्यावरुन ठाकरेंच्या खासदारांकडून पत्रकार परिषद घेतली जात आहे.
-
ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची पत्रकार परिषद लाईव्ह, कारण काय?
ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत ठाकरे गटातील खासदारांच्या इनकमिंगचा दावा केला होता. या दाव्यावरुन ठाकरेंच्या खासदारांकडून पत्रकार परिषद घेण्यात येत आहे.
-
नाशिकच्या रामकुंडवरील प्राचीन गोदावरी मंदिरात आज गंगा गोदावरी जन्मोत्सव
नाशिकच्या रामकुंडवरील प्राचीन गोदावरी मंदिरात आज गंगा गोदावरी जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात गोदावरी जन्म सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. पुरोहित संघाच्या वतीने वेद मंत्रांच्या घोषात जन्म सोहळा केला जाणार आहे.
-
खासदार संजय राऊत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार?
खासदार संजय राऊत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का अशी चर्चा आमदार संतोष बांगर यांच्या दाव्यानंतर होणार आहे. शिवसेना उबाठामध्ये कुणीही उरणार नाही खासदार नरेश मस्के यांनीही दावा केला आहे.
-
शेतकऱ्यांना स्कॅमचा फटका
मोबाईल वर आलेल्या PM किसान योजनेची लिंक उघडताच बँक खात्यातून पैसे गायब झाले. मोबाईलवर आलेल्या PM किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांच्या खात्यातून पैसे गायब झाले.
-
ते तर मुळव्याध
अपेंडिक्स पोटात असतो. काँग्रेसच्या शरीरातील मुळव्याध शिवसेना उबाठा आहे. महाबंडलेश्वर संजय राऊत बांडगुळाची भूमिका करत आहेत, अशी जळजळीत प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
-
डबल धमाका, रेपो दरात 0.25 टक्के कपात
12 लाख रुपयांपर्यंत आयकर न लावण्याच्या गोड बातमीनंतर आता सर्वसामान्यांना पुन्हा एक आनंदाची बातमी मिळाली आहे. RBI ने तब्बल पाच वर्षानंतर रेपो दरात कपातीचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे.
-
मोठी वाहतूक कोंडी
मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पालघर मधील मनोर ते दुर्वेस येथे ट्राफिक जॅम झाला आहे . मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलिसांच दुर्लक्ष दिसत आहे.
-
तुळजाभवानी मंदिर विकासासाठी लवकरच 2100 कोटी
श्री तुळजाभवानी मंदिर विकासाचा 2100 कोटी रुपयांचा आराखडा मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याच्यावर निर्णय होणार आहे.
-
Maharashtra News: जळगावात शहरातील नागरिकांकडे महापालिकेची तब्बल 212 कोटी रुपये थकबाकी
थकबाकीचा आकडा वाढतच चालल्याने महापालिका प्रशासनाने 12 पथके नियुक्त केली असून प्रत्येक पथकात 10 जणांचा समावेश आहे… मागील आर्थिक वर्षातच 50 टक्के वसुली झाली होती. यंदा आतापर्यंत 35 टक्के वसुली झाली. 31 मार्चपर्यंत 60 टक्के वसुलीचे उद्दिष्ट ; आतापर्यंत 19 कोटी 35 लाख रुपये म्हणजे वसूल झाल्याची माहिती…
-
Maharashtra News: अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप…
आपच्या 16 उमेदवारांना 15 कोटींची ऑफर… अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप… अरविंद केजरीवाल यांचा ट्विट करत गंभीर आरोप…
-
Maharashtra News: भारताची इज्जत काय हे भारताने दाखवून दिलं – संजय राऊत
अतिरेक्यांप्रमाणे भारतीयांना अमेरिकेने परत पाठवलं… भारताची इज्जत काय हे अमेरिकेने दाखवून दिलं… हातात बेड्या घालत परदेशी नारगिकांना पाठवलं जात नाही… भारतीयांना अमेरिकेकडून अमानुष वागणूक… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: समरजित घाटगेंच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम
समरजित घाटगे यांनी भाजप प्रवेशाबाबतचं वृत्त फेटाळलं आहे… समरजित घाटगेंच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम
-
Maharashtra News: ठाणे पालिकेच्या नवीन मुख्यालयासाठी अखेर उद्यानाचे आरक्षण बदलले
नागरिकांच्या विरोधाला पालिकेकडून केराची टोपली… ठाणे महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत अखेर उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभी राहणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.. नागरिकांचा विरोध डावलून अखेर ठाणे महापालिकेने उद्यानाचे आरक्षण बदलून त्या ठिकाणी प्रशासकीय इमारतीचे आरक्षण असा फेरबदल केला असून यासंदर्भात अध्यादेशही पालिकेच्या वतीने काढण्यात आला आहे… त्यामुळे उद्यानाच्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यास विरोध करणारे नागरिक आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करा… ठाकरे गटाचा पदाधिकारी आज घेणार पुणे पोलीस आयुक्तांची भेट….
अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना अटक करावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांचे भेट घेणार आहेत. यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर आक्रमक आंदोलन करण्यात आले होते.
-
एकमत न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजप स्वतंत्र लढणार – अतुल सावे
एकमत न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजप स्वतंत्र लढणार असल्याचं अतुल सावे म्हणाले आहेत. भाजपने विधानसभेत आपली ताकद दाखवली आहे असेही त्यांनी नमूद केलं.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. अतुल सावेंच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या जात आहेत.
-
आरबीआयचं पतधोरण आज होणार जाहीर
आरबीआयचं पतधोरण आज जाहीर होणार आहे. रेपो रेटमध्ये 0.25% कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात दुकांनाना आग, तीन दुकानं जळून खाक
पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात काल रात्री अकरा वाजता दरम्यान दुकानाना भीषण आग लागली होती, या आगीत तीन दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली. त्यामध्ये एक फुटवेअर शॉप आणि दोन रेडिमेड कपड्यांच्या शॉपचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर, शिवकालीन वाघनखं बघण्याची नागपूरकरांना संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर येणार असून मध्यवर्ती संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत. शिवकालीन वाघनखं बघण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे
Published On - Feb 07,2025 8:04 AM
