Maharashatra News Live : मनसे नेते संदीप देशपांडे यांचे अत्यंत गंभीर आरोप
पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.

LIVE NEWS & UPDATES
-
सफाई कर्मचारी पती पत्नीचा प्रामाणिक पणा 10 लाख किमतीचा डायमंड हार परत केला
दहा लाख रुपयांचा डायमंड हार कचऱ्यात सापडूनही प्रामाणिकपणे परत करणाऱ्या मिरारोडमधील सफाई कामगार दांपत्याचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
-
सतरा वर्षीय मुलीचा चोपडा येथील तरुणासोबत मार्च महिन्यात विवाह लावून दिल्याचा प्रकार समोर.
अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तीने नुकताच बाळाला जन्म दिल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या पतीसह सासू, सासरे, आई, वडील, मामा यांच्यासह नातेवाईक अशा १० जणांविरुद्ध बालविवाह व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
-
मनोज जरांगे पाटील 11 वाजता मस्साजोगमध्ये येणार
संतोष देशमुख खून प्रकरणाला आज एक वर्ष पुर्ण होत असल्याने अभिवादन करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील वाजता मस्साजोगमध्ये येणार आहेत. तर सायंकाळी 7 वाजता कॅन्डल मार्च काढला जाणार आहे.
-
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज कॅश बॉम्बचा धमाका
एकीकडे अंबादास दानवेंनी शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींचा कॅशसह व्हिडीओ समोर आणलाय तर, मनसेच्या संदीप देशपांडेंनी पिडब्लुडीच्या अधिका-यांचा लाच घेतांनाचा व्हिडीओ समोर आणलाय. विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे बंधुंच्या नेत्यांच्या कॅश बॉम्बवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता
-
मनसे नेते संदीप देशपांडे यांची मोठी मागणी
PWD बाब मनसे नेते संदीप देशपांडे धक्कादायक आरोप केला असून त्यांनी एक व्हिडीओही व्हायरल केला आहे .
-
-
नोकरीच्या आमिषाने लग्न करून फसविल्यामुळे कबड्डीपटू महिलेची आत्महत्या
नागपूर – नोकरीच्या आमिषाने लग्न करून फसविल्यामुळे कबड्डीपटू महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील माळेगाव टाऊन येथील धक्कादायक घटना आहे. किरण दाढे या कबड्डीपटू महिलेने आत्महत्या केली.
-
नागपूर- प्रभावी लसीकरण मोहिमा राबविण्यात येत असूनही बालमृत्यूचा प्रश्न गंभीर
नागपूर- कोट्यवधींचा खर्च करून प्रभावी लसीकरण मोहिमा राबविण्यात येत असूनही बालमृत्यूचा प्रश्न गंभीरच आहे. राज्यात एका वर्षात तब्बल 11,960 बालकांचे मृत्यू झाले आहेत. नागपुरात मार्च 2024 ते मार्च 2025 दरम्यान 1,172 बालमृत्यूंची नोंद झाली. नागपुरात जन्मानंतरच्या पहिल्या 28 दिवसांत 854 नवजातांचे मृत्यू झाले.
-
-
विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र कायम
नागपूर- विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र कायम आहे. मराठवाड्यातील आठ आणि विदर्भातील सहा अशा एकूण 14 जिल्ह्यांमध्ये आठ महिन्यात तब्बल 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 43 हंगामातील शेतकरी आत्महत्येचा आकडा तब्बल पस्तीस हजारांवर पोहोचला आहे.
-
धुळे शहराचा आणि जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला
धुळे शहराचा आणि जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 5.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तापमान कमी झाल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. थंडी वाढल्याने शाळेचा वेळ बदलण्याची मागणी पालकांनी केली आहे.
-
पालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार
पालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये यासंदर्भात दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण होते उपस्थित होते. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे लढवण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
महापालिकानिहाय स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये येत्या दोन- तीन दिवसांत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू होणार आहे. भाजप आणि शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षांमध्ये प्रवेश न देण्यावरही शिक्कामोर्तब झाला आहे.
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून राज्य विधिमंडळात 75 हजार 286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सोमवारी सादर करण्यात आल्या. यावरून राज्याचं वित्तीय नियोजन कोलमडल्याचं मानलं जात आहे. तर दुसरीकडे संसदेचंही हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तक इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. सोमवारीही 562 उड्डाणं रद्द झाली. इंडिगोच्या सेवेत गोंधळ झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे पाच हजार उड्डाणे रद्द करण्यात आली. या गोंधळाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी येत्या बुधवारी डीजीसीएची उच्चस्तरीय समिती कंपनीचे प्रमुख पीटर एल्बिस यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Published On - Dec 09,2025 8:24 AM
