AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दृश्यम’सारखाच तगडा सस्पेन्स, थरकाप उडवणारा क्लायमॅक्स; ‘मस्ट वॉच’मध्ये करा समावेश

सस्पेन्स आणि थ्रिलर सिनेमांची क्रेझ असणाऱ्या प्रेक्षकांसाठी सध्या ओटीटीवर अनेक दमदार पर्याय उपलब्ध आहेत. अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची चर्चा सुरू असतानाच, त्याआधी काही भन्नाट सस्पेन्स थ्रिलर सिनेमे पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळू शकते.

| Updated on: Sep 22, 2026 | 2:58 PM
Share
ह्यू जॅकमॅन अभिनीत 'प्रिजनर्स' (Prisoners) हा 2013 मध्ये प्रदर्शित झालेला सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. एका वडिलांची मुलगी अचानक बेपत्ता होते आणि तिचा शोध घेण्यासाठी ते स्वतः तपास सुरू करतात. मुलीच्या शोधादरम्यान संशय, अस्वस्थता आणि नैतिक प्रश्नांची गुंतागुंत वाढत जाते. डेनिस व्हिलेन्यूव्ह दिग्दर्शित हा सिनेमा प्राइम व्हिडीओवर पाहता येतो.

1 / 5
विजय सेतुपती यांचा ‘महाराजा’ हा सस्पेन्स थ्रिलरच्या चाहत्यांसाठी चांगला पर्याय आहे. सुरुवातीला साधी वाटणारी कथा जसजशी पुढे जाते, तसतसे अनेक रहस्यांचे पदर उलगडत जातात. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना मोठा धक्का देतो. त्यामुळे कथा आधीच माहीत असलेल्या प्रेक्षकांनाही हा चित्रपट पुन्हा पाहताना वेगळा अनुभव मिळू शकतो. ‘महाराजा’ नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

2 / 5
क्राइम आणि सस्पेन्सचा जबरदस्त मिलाफ असलेला 'नो कंट्री फॉर ओल्ड मेन' (No Country for Old Men) हा कोएन बंधूंचा गाजलेला चित्रपट आहे. एका व्यक्तीच्या हाती पैशांनी भरलेली बॅग लागते आणि त्यानंतर त्याच्या मागावर एक धोकादायक किलर लागतो. पैशांमागची धावपळ आणि जीव वाचवण्यासाठी सुरू झालेला संघर्ष चित्रपटाला वेगळीच दिशा देतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

3 / 5
विद्या बालनचा ‘कहानी’ हा भारतीय सस्पेन्स थ्रिलरमधील महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. पतीच्या मृत्यूमागचं सत्य शोधण्यासाठी एका महिलेचा सुरू झालेला प्रवास अनेक अनपेक्षित वळणं घेतो. चित्रपटाचा क्लायमॅक्स हा त्याचा सर्वात चर्चेतील भाग आहे. ‘कहानी’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

4 / 5
मल्याळम सुपरस्टार मोहनलालचा ‘थुडारुम’ हा एका सामान्य टॅक्सी ड्रायव्हरच्या आयुष्यात घडणाऱ्या संशयास्पद घटनांभोवती फिरतो. पोलिस यंत्रणा आणि मुख्य पात्र यांच्यातील संघर्षातून सिनेमाचं रहस्य उलगडत जातं. या चित्रपटात मोहनलालने शनमुघनची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा जियो हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

5 / 5
Follow Us
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...
आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर...
Maratha Andolan : आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून...
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून सरकारला सुनावलं
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क..
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...