23 APRIL 2024

नाणं दरीत फेकलं तरीही पाण्यातून वर येतं! कुठे आहे हा चमत्कारिक कडा? 

Mahesh Pawar

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तिच्या सानिध्यात राहते.

जरी एखादी वस्तू उंचीवर फेकली तरी ती गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर येते.

महाराष्ट्रातील असाच एक धबधबा गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचे पालन करतो. पण, त्या धबधब्याचे स्वतःचे असे नियम आहेत.

धबधब्यातील पाणी सुरुवातीला खालच्या दिशेने कोसळतं. परंतु पुढच्याच क्षणी वारा त्याला पुन्हा वरती नेतोय असे विहंगम दृश्य दिसतं.

थोडक्यात हा उलटा धबधबा असल्याचा भास व्हावा. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण आहे नाणेघाट.

पुण्यातील जुन्नरजवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात हे नाणेघाट आहे. तर, मुंबईपासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे.

उलट्या धबधब्यासाठी हा घाट जगभर प्रसिद्ध आहे. त्याचे सौंदर्य विशेषतः पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे.

वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नाणे घाटातील खालच्या दरीत नाणे जरी फेकले तरी हवेच्या किंवा वार्‍याच्या तीव्र दाबामुळे वर येते.

वाऱ्याच्या वेगाची तीव्रता गुरुत्वाकर्षणाच्या बलाएवढी किंवा त्याहून जास्त असते तेव्हा असे घडते.

याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे दरीतून सोसाटय़ाचा वारा वाहू लागला तर हा भलामोठा धबधबा उलटा फिरू लागतो.

अर्थात हा काही एकमेव उलटा धबधबा महाराष्ट्रात नाही. सावंतवाडी तालुक्याच्या अंबोली गावातील ‘कावळेसाद’ हा धबधबा देखील रिव्हर्स धबधबा आहे.

आंबोलीपासून 8 किलोमीटरवर ही प्रसिद्ध जलधारा आहे. विस्तीर्ण पठारावर एकत्र झालेले पाणी समोरच्या खोल दरीत धबधब्याद्वारे कोसळते.

हा धबधबा नेहमी धुक्यात दडलेला असतो. ढगांपाठी पाऊस सुरू झाल्यावर तो दिसू लागतो. दोन टप्प्यांमध्ये हा धबधबा कोसळतो.