अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026
अमरावती महापालिका
येत्या 15 जानेवारी रोजी अमरावती महापालिकेसाठी मतदान होत असून 16 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. अमरावती महापालिते एकूम 22 प्रभागातून 87 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. महापालिका निवडणुकीसाठी 6 लाख 77 हजार 180 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात महिला मतदारांची संख्या 3,37,935 इतकी आहे. तर पुरुष मतदारांची संख्या 3,39,177 इतकी आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या 68 इतकी आहे. एकूण 87 नगरसेवकांपैकी 44 जागा महिलांसाठी राखीव, अनुसूचित जातीसाठी 15 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी 23 जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. अमरावती महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
अमरावती महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) अमरावती महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
- अमरावती महापालिकेत एकूण 22 प्रभाग आहेत.
2) किती प्रभागातून किती एकूण किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- एकूण 22 प्रभागातून 87 उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
3) अमरावती महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- अमरावती महापालिकेत एकूण 6 लाख 77 हजार 180 मतदार आहेत.
4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?
- यात पुरुष मतदारांची संख्या 3,39,177 इतकी आहे.
5) महिला मतदारांची संख्या किती?
- तर महिला मतदारांची संख्या 3,37,935 इतकी आहे.
नवनीत राणा आणि खासदार बोंडेंमध्ये जुंपली
Anil Bonde-Navneet Rana: अमरावती महानगरपालिकेत मित्रपक्षातच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. रवी राणा-नवनीत राणा विरुद्ध भाजप असा सामना इथं रंगला आहे. युवा स्वाभिमानी पक्ष आणि भाजपमध्ये महापालिकेत काही ठिकाणी युती तर काही प्रभागात सामना पाहायला मिळत आहे. त्यातून दोघांमध्ये सामना रंगला आहे.
- Reporter Swapnil Umap
- Updated on: Jan 08, 2026
- 2:47 PM
पती विरोधात लढाल तर...राणांच्या त्या भूमिकेचं बच्चू कडूंकडून कौतुक
Bacchu Kadu on Navneet Rana And Ravi Rana: अमरावती महापालिका निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. बच्चू कडू यांनी कट्टर विरोधक नवनीत राणा आणि रवी राणा यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे समोर आले तर दोघांचा शाल देऊन सत्कार करण्याचा मनोदय पण व्यक्त केला आहे. अमरावतीच्या आखाड्यात काय घडतंय?
- Reporter Swapnil Umap
- Updated on: Jan 06, 2026
- 9:39 AM
Shivsena-BJP: सत्तेतील सहकारी, महापालिकेत विरोधात
Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणुकीत आता मोठी धुमश्चक्री दिसून येत आहे. राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजप-शिवसेना महापालिकेत मात्र आमने-सामने उभे ठाकले आहे. मुंबई आणि इतर काही ठिकाणं वगळता राज्यात 10 महापालिकेत दोन्ही पक्षाचं जागा वाटपावरून चांगलं बिनसलं आहे. काय आहे ती अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 30, 2025
- 12:02 PM
मोठी बातमी ! शिवसेनेच्या बड्या नेत्याची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
Amravati Municipal Election : अमरावती महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटी दरम्यान शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना आता रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 28, 2025
- 10:52 PM
मोठी बातमी ! अखेर शिवसेना-भाजपची युती तुटली, संपूर्ण राज्यात खळबळ
Amravati Municipal Corporation Election : अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली युतीची बोलणी फिस्कटली आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 28, 2025
- 4:55 PM