Maharashtra Breaking News LIVE : आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकादरम्यान धक्कादायक प्रकार
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

पुण्यातील कोथरूड येथे एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही दावा पीडित महिलेने केला आहे. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. या घटनेमुळे स्थानिक वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी शहराच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी तीन वाजता त्यांच्या हस्ते शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतरही मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच आज मध्य रेल्वेवर चार तास, तर हार्बर रेल्वेवर पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकादरम्यान धक्कादायक प्रकार
आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकादरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. चोरट्याने मेल एक्सप्रेसच्या दारावर उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल हिसकावला आहे. चोरट्याने मारलेल्या फटक्यामुळे प्रवासी मेलमधून खाली पडला. यात प्रवाशाच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरट्याने त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या प्रवासाचे 20 हजार देखील लुटले. दरम्यान रेल्वे जीआरपीकडून या प्रकरणात तपास केला जात आहे
-
जितेंद्र आव्हाड यांना हिंदू असल्याचा विसर : नितीश राणे
जितेंद्र आव्हाड विसरून गेले आहेत का ते देखील हिंदू आहेत. ते सातत्याने हिंदू धर्मावर टीका करत असतात. सगळे नालायक हिंदू धर्मातच तयार होतात. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना जितेंद्र आव्हाड यांची ही भूमिका मान्य आहे का? असा प्रश्न नितेश राणे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना विचारला. नितेश राणे यांनी अमरावतीत ही प्रतिक्रिया दिली.
-
-
मीरा-भाईंदरमधील पालिकेच्या बसला वाहतूक हवालदार-नागरिकांकडून दे धक्का
मीरा-भाईंदरमधील महानगरपालिकेच्या बसला वाहतूक हवालदार आणि नागरिकांना धक्का देण्याची वेळ आली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या बसेस वारंवार बिघडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. आजही अशीच एक घटना घडली. महानगर पालिकेची बस अचानक रस्त्यातच बंद पडली. या अनपेक्षित बिघाडामुळे प्रवाशांची गैरसोय झालीच. इतकंच नाही तर वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. मात्र मदतीसाठी स्थानिक आणि पोलीस कर्मचारी सरसावले. स्थानिक आणि पोलिसांनी बसला धक्का देत गाडी बाजूला केली.
-
कोणत्याही पक्षाने कोणताही दावा केला नाही किंवा आक्षेप घेतला नाही – निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की 1 ऑगस्ट 2025 (दुपारी 3) ते 3 ऑगस्ट (दुपारी 3) पर्यंत कोणत्याही पक्षाने पात्र मतदारांची नावे जोडण्यासाठी आणि अपात्र मतदारांची नावे वगळण्यासाठी आक्षेप घेतलेला नाही.
-
तीन नवीन एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू
- भावनगर-अयोध्या एक्सप्रेस रेल्वे सेवा
- रेवा-पुणे एक्सप्रेस ट्रेन सेवा
- जबलपूर-रायपूर एक्सप्रेस ट्रेन सेवा
-
-
पंतप्रधान मोदी 10 ऑगस्ट रोजी बेंगळुरूच्या यलो लाईन मेट्रोचे उद्घाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट रोजी बेंगळुरूच्या यलो लाईन मेट्रो सेवेचे उद्घाटन करतील. भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी रविवारी याची घोषणा केली.
-
निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांना दोन EPIC प्रकरणांमध्ये नोटीस बजावली
राजद नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. दोन मतदार ओळखपत्र प्रकरणात आयोगाने त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे.
-
शिरूर: भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी
शिरूरच्या ओयासीस कॉलनीत दुपारी फुले तोडत असलेल्या 65 वर्षीय छाया सातारकर यांच्या गळ्यातील सुमारे 90 हजारांचे मंगळसूत्र दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आरोपींनी गळ्यातील मंगळसूत्र ओढून मोटारसायकलवरून पळ काढलाय . शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस अधिकचा तपास करत आहे .
-
मुंबईच्या परळ वर्कशॉप मधून गणपती निघाले
मुंबईच्या परळ वर्कशॉप मधून गणपती आपापल्या मंडपात निघाले आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर गणपतीची आगमन मिरवणूक सुरू आहे. मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळाला. ट्रॅफिकची समस्या होऊ नये याची मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
-
गाईला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला पाहिजे – शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
गाईला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राष्ट्रपती द्रोपदी मुरमुरे यांना पत्र लिहिणार आहे असं विधान शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केलं आहे.
-
जळगाव: गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यकर्ता मेळावा पार पडला
जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. पूर्ण शक्तीनिशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी करा असा कानमंत्र मंत्री गिरीश महाजन यांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
-
प्रहारची बॅनरबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रहारची कर्जमाफीसाठी बॅनरबाजी दिसून आली. मुख्यमंत्री साहेब कर्जमाफीची तारीख घोषित करा.. मोर्शीमध्ये अशा आशयाचे प्रहारचे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे. मुख्यमंत्री यांनी निवडणुकीआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते.
-
भाजपाचे स्वबळाचे नारे
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये काँग्रेस सह सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत.
-
धाराशिवमध्ये डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी
धाराशिव मध्ये शासकीय रुग्णालयातील डॉक्टराच्या गळ्याला सत्तुर लावून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करणाऱ्या राजस्थान येथील डॉक्टराच्या गळ्याला सत्तर लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय.
-
मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहनधारक हैराण
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातीवली जवळील रखडलेला ब्रिज आणि महामार्गावर पडलेले खड्डे यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील सातीवली येथे मागच्या सहा महिन्यांपासून ब्रिज चे काम रखडत रखडत होत, आजूबाजूला चिखल, रस्त्यावर खड्डे यामुळे खड्ड्यात महामार्ग की महामार्गात खड्डे हाच प्रश्न पडला आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत, त्या खड्ड्यात पाणी साचल्याने, खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात वाढत आहेत. वर्सोवा ते अच्छाड पर्यंत 121 किलोमीटर चा सिमेंट काँक्रिट चा रस्ता झाला आहे. मात्र पूर्ण रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असल्याने महामार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत.
-
मिरा-भाईंदर देशात अव्वल
स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये ३ ते १० लाख लोकसंख्या श्रेणीत मिरा-भाईंदरला देशात पहिला क्रमांक आला आहे. यशाचा जल्लोष मॅक्सस मॉल ते महापालिका मुख्यालय अशी ‘विजयी मिरवणूक’ काढण्यात आली. आमदार नरेंद्र मेहता आणि आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
-
मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये ती आदळली
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते, ती पहिल्या मजिल्यावरून थेट जमिनीवर आदळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. सर्वांना तातडीने लिफ्टमधून बाहेर काढण्यात आले.
-
कल्याण म्हाडा वसाहत प्रकरण तापले
आज म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासावरून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण झोन 3 चे उपायुक्त अतुल झेंडे यांच्या कार्यालय बाहेर शेकडो कार्यकर्ता सह उपोषण करणार असल्याची भूमिका मांडली. तर शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपोषण केल्यास इमारतीतील लोक देखील उपोषण करणार असल्याचे सांगत कायदा सुव्यवस्था निर्माण झाली तर याला पोलीस आणि नरेंद्र पवार जबाबदार असल्याचा इशारा दिला होता. आमदाराच्या इशारा नंतर पोलिसांनी नरेंद्र पवार आणि इतर कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी परवानगी नाकारत नोटीसा बजावल्या .
-
आव्हाडांनी धर्मगुरूच व्हावे
जितेंद्र आव्हाड यांचा धर्माच्या बाबतीत खूप अभ्यास आहे, त्यांनी धर्मगुरूच व्हायला पाहिजे,असे वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे.
-
आसिम सरोदे असतील किंवा संजय राऊत असते हे नेहमीच काहीतरी बोलत असतात: प्रकाश सुर्वे
“बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारा पक्ष हा एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. घटनेमध्ये कायदा आहे अशा बडबड करणारे कावळे यांच्या बडबडण्यांनी काही होत नसतं”असं प्रकाश सुर्वे म्हणाले.
-
काळाचौकीच्या महागणपतीचा आगमन सोहळा
काळाचौकीच्या महागणपतीचा आगमन सोहळा पार पडत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांची प्रचंड गर्दीही दिसत आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे.
-
सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन आक्रमक
सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेले सांगलीतील प्रशिक्षणार्थी रस्त्यावर उतरले आहेत. स्टेशन चौक या ठिकाणी संतप्त प्रशिक्षणार्थ्यांकडून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न. आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थी तरुणीला चक्कर आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने प्रशिक्षणार्थी आणखी आक्रम झाले आहेत.
-
सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग
सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्टसर्किटमुळे किरकोळ अगीची घटना घडली आहे. रेल्वे स्टेशनवर लागलेल्या अगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रेल्वे स्थानाकावरील वीजपुरवठा 1 तास बंद करण्यात आला होता
-
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील एसआयटी प्रमुख बीडमध्ये दाखल
बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत हे बीडमध्ये दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. IPS पंकज कुमावत आणि टिम बीडमध्ये तळ ठोकून असणार आहे तर महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींचा जोपर्यंत छडा लागत नाही तोपर्यंत पंकज कुमावत हे बीड आणि परळीत 24 तास असण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक संतोष साबळे आणि पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ हे देखील असणार आहेत. मात्र तपासादरम्यान कुठल्याही गोष्टीची बाहेर वाच्यता होऊ नये किंवा प्रभावित होऊ नये यासाठी संपूर्ण तपास गोपनीय ठेवला जाणार आहे.
-
16 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचं अपहरण
बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात शाळकरी मुलीचे तीन आरोपींनी चारचाकी गाडीतून अपहरण करत तिचा विनयभंग केला. तसेच प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली आणि घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी नेकनूर पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
-
पंकजा मुंडेंनी चिमुकल्यांसोबत सोबत साजरा केला मैत्री दिन
मंत्री पंकजा मुंडे आज परळी मतदारसंघात आहेत. यादरम्यान पंकजा मुंडेंना भेटण्यासाठी आणि मतदारसंघातील कामकाजा संदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच यशश्री निवासस्थानी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांच्या या भेटीने जनता दरबाराचे स्वरूप आले आहे. तर मैत्रीदिनानिमित्त पंकजा मुंडेंना भेटण्यासाठी काही चिमुकल्या आवर्जून यशश्री निवासस्थानी आल्या. या चिमुकल्या सोबत पंकजा मुंडे यांनी मैत्री दिन साजरा केला.
-
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रहारची बॅनरबाजी
अमरावती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रहारची कर्जमाफीसाठी बॅनरबाजी करण्यात आली. मुख्यमंत्रीसाहेब कर्जमाफीची तारीख घोषित करा, असे बॅनर मोर्शीमध्ये लागले आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण करावे यासाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून आंदोलन करण्यात येतंय.
-
INDIA आघाडीच्या बैठकीच्या अनुषंगाने राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली
INDIA आघाडीच्या बैठकीच्या अनुषंगाने राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असल्याची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत INDIA आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. ७ ऑगस्टला दिल्लीत INDIA आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
-
शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळं फासलं
प्रतिक्षानगरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळं फासलं आहे. रामदास कांबळे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत आज ठाण्यात पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश होताच त्यांच्या बॅनर आणि फोटोवर प्रतिक्षानगरमध्ये काळं फासायला सुरुवात झाली.
-
कल्याणमध्ये भाजपचं शक्तिप्रदर्शन करत पक्षप्रवेश
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये काँग्रेससह सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले. कल्याण डोंबिवलीला लागलेला विकासाचा ग्रहण दूर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचा महापौर येणं अत्यंत गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
-
धाराशिवमध्ये शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी
धाराशिवमध्ये शासकीय रुग्णालयातील डॉक्टराच्या गळ्याला सत्तूर लावून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटर्नशिप करणाऱ्या राजस्थान इथल्या डॉक्टराच्या गळ्याला सत्तूर लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
-
रांजणगाव पोलीस स्टेशनजवळ मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न
कारेगावमधील गोरेश्वर मल्टीस्टिक पतसंस्थेवर चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. शिरूर तालुक्यातील कारेगाव इथल्या गोरेश्वर मल्टीस्टिक पतसंस्थेवर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी मजबूत असल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. ही पतसंस्था स्थानिक पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असूनही चोरट्यांनी असा प्रयत्न केल्याने नागरिकांतमध्ये खळबळ उडाली आहे.
-
25 ते 30 वर्ष वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला…
गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी शेत-शिवारातील घटना…. मृतक महिलेच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा… डूग्गीपार पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू…
-
कृष्णा नदीपात्रात पुन्हा मळी मिश्रित पाणी सोडण्याचा प्रकार समोर
नदी काठच्या कोणत्यातरी साखर कारखान्याने हे मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्याचा कसबे डिग्रज ग्रामस्थ सुनील फराटे आणि ग्रामस्थ याचा आरोप… मौजे डिग्रज भागातील नागरिकांनी प्रदूषण मंडळाकडे केली तक्रार… कृष्णा नदीत पाण्याला प्रचंड दुर्गंधी आणि मासे देखील मरु लागले आहेत.
-
माजी आमदार बाबाजानी दुर्रानी काँग्रेसच्या वाटेवर,
7 तारखेला मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा… दुर्राणी यांच्या समर्थकांकडून 7 तारखेला काँग्रेस पक्षप्रवेशाच्या बॅनर्स समाज माध्यमांवर व्हायरल केले जात आहे… अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश रखडल्यानंतर दुर्राणी यांच्या काँग्रेसच्या सोबतच्या भेटीगाठी वाढल्या होत्या… सुरेश वरपूडकर भाजपमध्ये गेल्यानंतर बाबाजानी दुर्रानी यांना काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे,
-
INDIA आघाडीच्या बैठकीच्या अनुषंगाने राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असल्याची माहिती
ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर… दिल्लीत INDIA आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार… उद्धव ठाकरे ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दिल्ली दौऱ्यावर असणार… ७ ऑगस्टला दिल्लीत INDIA आघाडीच्या नेत्यांची बैठक… INDIA आघाडीच्या बैठकीच्या अनुषंगाने राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असल्याची माहिती
-
संजय राऊत यांचे मोठे विधान
मराठी भाषेवर हिंसा करणार, करा काय करायचे ते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-
किरकोळ भांडणाच्या रागातून तरुणाची हत्या
उल्हासनगर कॅम्प १ परिसरातील घटनेचं सीसीटीव्ही समोर. सर्व आरोपींना बेड्या ठोका अन्यथा मृतदेह नेणार नाही!
-
ई-शिवाई बससेवा एसटी विभागासाठी अत्यंत फायदेशीर, तब्बल 3 कोटींची कमाई
ठाणे ते अलिबाग मार्गावर सुरू करण्यात आलेली ‘ई-शिवाई’ बससेवा एसटी विभागासाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये या बसने तब्बल तीन कोटी दहा लाख रुपयांची कमाई केली आहे. पर्यावरणपूरक आणि आरामदायक असलेल्या या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठाणे ते अलिबाग हे ९७ किलोमीटरचे अंतर ‘ई-शिवाई’ बस केवळ २ तास ४५ मिनिटांत पूर्ण करते, ज्यासाठी केवळ २२० रुपये भाडे आकारले जाते. ठाण्यातील खोपट आगारातून दररोज सकाळी ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मार्गावर आठ फेऱ्या चालवल्या जातात. यामुळे ही सेवा एसटी विभागासाठी ‘मालामाल’ ठरली आहे.
-
नाशिकमध्ये बेंचवर बसण्यावरून एका शाळकरी मुलाची हत्या
नाशिक शहरातील सातपूर भागात एका धक्कादायक घटनेत, बेंचवर बसण्यावरून झालेल्या वादातून एका शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली आहे. सातपूर येथील ज्ञानगंगा क्लासमध्ये शिकणाऱ्या यशराज गांगुर्डे याचा त्याच्याच दोन अल्पवयीन मित्रांनी मारहाण करून जीव घेतला. बुधवारी क्लासच्या आवारात यशराजचा या दोन मुलांसोबत बेंचवर बसण्यावरून वाद झाला. याच वादातून त्यांनी यशराजला हाताच्या चापटी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
-
नाशिक शहरात डेंग्यूचा उद्रेक, रुग्णांची संख्या 84 वर
नाशिक शहरात डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, वैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यापासून डेंग्यूने शहरात शिरकाव केला. मे महिन्यात १७ रुग्ण आढळले, तर जूनमध्ये ही संख्या २५ पर्यंत पोहोचली. विशेषतः जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊन ही संख्या तब्बल ८४ वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर डेंग्यू नियंत्रणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
-
कल्याणमधील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासावरून शिंदे गट आणि भाजपचा वाद चव्हाट्यावर
कल्याणमधील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासावरून आता शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी विकासकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषद घेत, “पवार हे श्रेयवादासाठी राजकारण करत आहेत. त्यांची खरी लढाई भाजपमधीलच रवींद्र चव्हाण आणि कपिल पाटील यांच्याशी आहे. उपोषणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस आणि पवार जबाबदार असतील,” असा इशारा दिला. यावर प्रत्युत्तर देत नरेंद्र पवार यांनी, “तुमची जबाबदारी जनतेशी की बिल्डरशी आहे? विकासकावर गुन्हा दाखल करा, आम्ही उपोषण मागे घेऊ,” अशी मागणी केली. सत्ताधारी युतीमधील या अंतर्गत वादाने स्थानिक रहिवाशांनी मात्र संताप व्यक्त केला असून, राजकारण बाजूला ठेवून घरे देण्याची मागणी केली आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्शी शहराच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दुपारी तीन वाजता त्यांच्या हस्ते शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत मंत्री नितेश राणे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतरही मंत्री उपस्थित राहणार आहेत. या भूमिपूजन सोहळ्यामुळे मोर्शी शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
Published On - Aug 03,2025 9:02 AM
