AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भैरवनाथांचा जागर होणार, बारा बलुतेदारीचं प्रतीक, वाई तालुक्यातील बगाडाला सुरुवात

महाराष्ट्रात प्रत्येक सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. राज्यातील सुप्रसिद्ध अशी वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा आज 22 मार्च रोजी पार पडणार आहे.

| Updated on: Mar 22, 2022 | 8:44 AM
Share
महाराष्ट्रात प्रत्येक सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. राज्यातील सुप्रसिद्ध अशी वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा आज 22 मार्च रोजी पार पडणार आहे. या यात्रेचे बगाडाची बांधणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. या बरोबरच बगाड मार्गाची स्वच्छता करण्यात येत असून रस्ता रुंद केला जात आहे.

1 / 5
कोरोना काळामुळे मागील 2 वर्ष ही यात्रा भरवण्यात आली नव्हती. पण यंदा मात्र निर्बंध संपल्याने मोठ्या उत्साहात बगाड यात्रा साजरी होणार आहे.या यात्रेचा यंदाचा मान शेलारवाडी येथील बाळासाहेब मांढरे यांना मिळाला आहे.

2 / 5
या यात्रेचा बगाड्या होण्यासाठी देवाला प्रतीवर्षी होळी पौर्णिमेच्या रात्री भैरवनाथाच्या मंदिरात कौल लावला जातो. होळी पौर्णिमेनिमित्त बागड कोणावर आलाय याचा कौल नाथाच्या कृपेने पंच मंडळी घेत असतात. बगाडाच्या एक दिवस आधी रात्री भैरवनाथ मंदिरासमोर हे बगाड उभे केले जाते यानंतर देवाचा छबिना बगाड्या सह सोनेश्र्वर मंदिराच्या दिशेने वाजतगाजत पाठवला जातो.

3 / 5
यात्रेच्या मुख्य दिवशी राज्यात सर्वत्र रंगपंचमी साजरी होत असताना साताऱ्यातील वाई तालुक्यात बावधन मध्ये बगाड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.  सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोनेश्वर मंदिर या ठिकाणाहून बगाड्या चे पूजन करून बगाड्या(बाळासाहेब मांढरे) यांना बगाडाला लटकवले जाते

4 / 5
दहा वाजल्यापासून सोनेश्वर मंदिरापासून बगाडाला बैल जोडी जुंपून सुरुवात होते. या बगाडाचा वरील भाग जागोजागी थांबवून पूर्णपणे गोल फिरवला जातो. लाखो भाविक या बगाडाच्या यात्रेला राज्यभरातून येतात. सकाळी सुरु झालेले हे बगाड  चार वाजेपर्यंत हे बगाड सुमारे 4 किलोमीटर अंतर पार करून बावधन गावातील भैरवनाथ मंदिरापर्यंत खिल्लारी बैल जोडी च्या मदतीने आणले जाते. यावेळी बगाड्याचा नवस पूर्ण होतो आणि यानंतर बगाड्याला बगाडा वरून खाली उतरवला जाते.

5 / 5
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.