Maharashtra Breaking News LIVE 18 January 2025 : ठाणे येथे कोकण ग्राम विकास मंडळाचा ‘मालवणी महोत्सव २०२५’
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 18 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का
निफाड आणि दिंडोरी तालुक्यात ठाकरे गटाला धक्का बसला आहे. दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे. शिवसेना सचिव भाऊ चौधरी उपनेते विजय करंजकर महानगर प्रमुख बंटी तिथे तुम्ही यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
-
सावकाराच्या जाचाला कंटाळून कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न
सावकाराच्या जाचाला कंटाळून चिखलीतील कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. पोटच्या मुलाचा आगोदर खून करुन पती-पत्नीने केला आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी शुभांगी वैभव हांडे आणि मुलगा धनराज वैभव हांडे या दोघांचा मृत्यू झाला तर पती वैभव मधुकर हांडे थोडक्यात बचावले.
-
-
सांगली जिल्हाधिकारींची कानउघाडणी
सांगली जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी याची भर कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांनी कानउघाडणी केली. स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमातील भर भाषणात मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. भर कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले. व्यापक कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. जिल्ह्यात फक्त चारच ग्रामसेवक आहेत का? असा संतप्त सवाल मंत्री जयकुमार गोरे यांनी विचारला.
-
जालना वॉटर ग्रीड योजनेचे पाणी 56 गावात पोहोचलेच नाही- माजी मंत्री लोणीकर
कंत्राटदार आणि प्राधिकरणाने खोटा अहवाल देऊन शासनाची फसवणूक केल्याने जालना वॉटर ग्रीड योजनेचे पाणी 56 गावात पोहोचले नाही असा आरोप माजी मंत्री लोणीकर यांनी केला आहे. येत्या 4 महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत चालू करा अन्यथा चौकशी समिती नेमून कारवाई करणार असा इशाराही माजी मंत्री लोणीकर यांनी केला आहे.
-
ठाणे येथे कोकण ग्राम विकास मंडळाचा ‘मालवणी महोत्सव २०२५’
ठाणे येथील उन्नती गार्डन मैदान, पोखरण रोड नं. १, शिवाईनगर, ठाणे (पश्चिम) येथे कोकण ग्राम विकास मंडळाच्या ‘मालवणी महोत्सव २०२५’चे आयोजन केले आहे.
-
-
पीएम मोदींनी 65 लाखांहून अधिक कुटुंबांना स्वामित्व कार्डचे वाटप केले
पंतप्रधान मोदींनी आज 65 लाखांहून अधिक कुटुंबांना मालकी पत्रांचे वाटप केले. यावेळी ते म्हणाले की, आजचा दिवस देशाच्या गावांसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना त्यांचे कायदेशीर पुरावे देता यावेत म्हणून मालकी योजना पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती.
-
कोलकाता डॉक्टर बलात्कार हत्याकांड: संजय रॉय दोषी
कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणी न्यायालयाचा निकाल आला आहे. सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉयला दोषी घोषित केले आहे.
-
-
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (फीटनेस), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग,यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्षित राणा (इंग्लंड मालिकेसाठी, बुमराह फीटनेस)
-
खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्यमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे की यामधला एकही आरोपी सुटता कामा नये कारण हे खूप मोठे शेडयंत्र आहे. ही खूप मोठी टोळी आहे आणि ही सगळी संपली पाहिजे. कारण खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
-
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख, सुषमा अंधारेंकडून टीका
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट वर जातीचा उल्लेख करणे गंभीर आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहेच.
-
संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज सुनावणी, सीआयडीचे पथक न्यायालयात पोहोचले
बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. सुदर्शन घुलेसह सहा आरोपींवर आज सुनावणी होणार आहे. आता सीआयडीचे पथक न्यायालयात पोहोचले आहे.
-
टॉवर लोकेशनवरून आरोपीचा शोध
सैफ अली खान हल्ला प्रकरणात त्या रात्रीचे इमारत परिसरातील टॉवर लोकेशन आणि डंम डाटा पोलिस काढत आहेत. त्या वेळी किती मोबाइल अॅक्टीव होते. त्या आधारावर त्या सुरू असलेल्या नंबरचा सीडीआरही काढला जात आहे. वांद्रे येथील एका सीसीटिव्हीत आरोपी फोनवर बोलत जाताना पोलिसांना आढळून आला आहे.
-
सर्व गोष्टी स्वच्छ झाल्या असे नाही -छगन भुजबळ
कुण्या एका व्यक्तीचे अधिवेशन नाही. पक्षाचे अधिवेशन आहे. मला विनंती केली म्हणून मी अधिवेशनाला आलो आहे. नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
-
शक्तीपीठ महामार्गाविरोधात विशाल पाटील आक्रमक
सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात खासदार विशाल पाटील देखील आक्रमक झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा वगळला असेल तर सांगलीतून कोकणात गाड्या विमानाने घेऊन जाणार का ? असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी केला आहे.
-
किरकोळ कारणावरून शेडोळवाडीच्या सरपंचांना बेदम मारहाण
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात असलेल्या शेडोळवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि गावातील युवकांमध्ये वाद झाला.. किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, सरपंचाना गावातीलच दोन ते चार युवकांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
-
रिक्षा चालकाची चौकशी
अभिनेता सैफ अली खान याला जखमी अवस्थेत रुग्णालयात आणणारा ऑटोचालक भजनसिंग राणा याला वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. भजनसिंग राणा हा तोच ऑटो चालक आहे ज्याने सैफ अली खानला घरातून जखमी अवस्थेत लीलावती हॉस्पिटलमध्ये योग्य वेळी नेले होते.
-
छगन भुजबळ शिर्डीत दाखल
गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले छगन भुजबळ आज शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात दाखल झाले. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली आहे का? ते काय बोलतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
-
आंबेडकर अनुयायींचा लाँग मार्च
आंबेडकर अनुयायी लाँग मार्चचा आज दुसरा दिवस आहे, परभणी जिल्ह्यातील कुंभकर्ण टाकळी येथे पहिला मुक्काम झाल्यानंतर आज हा मोर्चा बोरीच्या दिशेने निघाला आहे, जिंतूर तालुक्यातील बोरी येथे आज मार्चचा मुक्काम असणार आहे. सोमनाथ सूर्यवंशी , विजय वाकोडे यांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.
-
Maharashtra News: संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून
अर्थसंकल्पीय अधिवेशन एक्सप्लेनर… संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून… 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प… देशवासीयांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार… यंदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात
-
Maharashtra News: आंबेडकर अनुयांकडून सुरू असलेल्या लॉन्ग मार्चचा दुसरा दिवस
दुसऱ्या दिवशी कुंभकर्ण टाकळी येथून मार्च जिंतूर तालुक्यातील बोरीकडे रवाना… मोठ्याप्रमाणावर महिलांसह आंबेडकर अनुयायी मार्चमध्ये चालत आहेत… मार्च हळूहळू मार्गस्थ झाला आहे.
-
Maharashtra News: नाशिकच्या द्वारका अपघातातील मृत्यूचा आकडा 9 वर
आघाडी झाली तर ठीक नाहीतर, राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार… पालिका निवडणुकीबाबत दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान…
-
Maharashtra News: आघाडी झाली तर ठीक नाहीतर, राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार – दिलीप वळसे पाटील
आघाडी झाली तर ठीक नाहीतर, राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार… पालिका निवडणुकीबाबत दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान…
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार सतीश चव्हाण अजित पवार गटाच्याअधिवेशनाला उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गंगापूर विधानसभेचे उमेदवार सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित आहेत. सतीश चव्हाण यांची विधानपरिषदेची आमदारकी रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधीमंडळाला दिलेले पत्र पक्षाने माघारी घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधीमंडळाला दिलेल्या पत्रामुळे सतीश चव्हाण यांचा पक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या दोन दिवसीय अधिवेशनात त्यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश होणार असल्याचे समजते.
-
सैफ हल्ला प्रकरण : हल्लेखोराने दादरच्या मोबाईल स्टोरमधून हेडफोन विकत घेतल्याचे उघड
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याने दादरच्या लक्ष्मी हाॅटेल जवळ असलेल्या एका मोबाईल फोन स्टोअरमधून एक हेडफोन विकत घेतला आणि यानंतर पळ काढल्याचे समोर आले आहे. दादरच्या लक्ष्मी हाॅटेल परिसरातील सीसीटीव्ही मुंबई क्राईम ब्रांचने चेक केले असून अधिक तपास सुरू आहे.
-
सैफ अली खानचा हल्लेखोर महाराष्ट्राबाहेर ? मोठी अपडेट समोर
सैफ अली खान प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आला आहे. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी महाराष्ट्राबाहेर पडला असून तो गुजरातच्या दिशेने निघाला असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई पोलिसांच्या पथकाने वांद्रे ते विरारपर्यंतच्या सर्व रेल्वे स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. आरोपी गुजरातच्या दिशेने निघाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांचे पथक आता महाराष्ट्राबाहेर आरोपींचा शोध घेत असून, पोलिसांचे एक पथक गुजरातलाही गेले आहे.
-
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी घुलेसह 5 जणांना आज न्यायालयात हजर करणार
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह पाच आरोपींची सीआयडी कोठडी संपत आहे. सर्व आरोपींना आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपींमध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे. आज दुपारी होणाऱ्या सुनावणी कडे राज्याचे लक्ष लागले आहे.
-
भाजपचे मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची आज बैठक
भाजपचे मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची आज बैठक होणार आहे. लोअर परळ येथील संघ मुख्यालयात आजपासून दोन दिवस ही बैठक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी तसेच चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीस उपस्थित राहतील.
संघाकडून मंत्र्यांन कसा कारभार करावा याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. कामगार, उच्च व तंत्रशिक्षण, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, ग्रामविकास, वनविभागाशी संबंधित विषयांवर विशेषत्वाने संघाची भूमिका आणि अपेक्षा याबाबत मंत्र्यांना अवगत केले जाईल. संघाच्या प्रमुख अजेंड्यावर देखील आजच्या बैठकीत मार्गदर्शन केले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता याबाबत देखील आजच्या बैठकीत कामाची रूपरेषा ठरवली जाईल.
-
ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर?
ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर? नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ अजित पवार आमने- सामने येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला आज भुजबळ हजर राहणार आहेत.
प्रकृती अस्वस्थामुळे छगन भुजबळ शिबिराला उपस्थित राहणार नव्हते. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा विनंतीला मान देऊन भुजबळ शिबिराला हजेरी लावणार असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आजपासून शिर्डीत दोन दिवसीय नवसंकल्प अधिवेशन पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत मंथन होणार आहे. नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ अजित पवार आमने- सामने येणार आहेत. माजी मंत्री असलेलेछगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर भाजपचे मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची आज बैठक होणार आहे. लोअर परळ येथील संघ मुख्यालयात आजपासून दोन दिवस ही बैठक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी तसेच चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीस उपस्थित राहतील. हिंदुत्वाच्या मुद्यावर संघनेते भाजप मंत्र्यांना कानमंत्र देणार आहेत. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने 80 हजार रुपयांचा टप्पा पुन्हा पार केला आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा ७०० रुपयांनी सोने महाग होऊन सोन्याचे दर 80 हजार 400 रुपये एवढे झाले आहेत. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
Published On - Jan 18,2025 9:02 AM





