Photo : तुळजाभवानीच्या दारात श्रद्धेचा बाजार, प्रशासनाच्या डोळ्यादेखत भाविकांच्या पैशांवर डल्ला!

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व मंदिरं आणि धार्मिक स्थळं बंद आहेत. अशावेळी भाविक देवाच्या दर्शनासाठी गेले तरी महाद्वारावर पायरीचं दर्शन करुन परत येत आहेत. मात्र, महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानीच्या दारात भाविकांची लूट सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

| Updated on: Sep 24, 2021 | 3:20 PM
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोरील मुख्य जिजाऊ महाद्वारसमोर प्रति तुळजाभवानी मुर्ती स्थापन करून भाविकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे तुळजाभवानी मंदिर बंद आहे. असं असताना मंदिराबाहेर मात्र भाविकांची मोठी लूट सुरु असल्याचं पाहायला मिळालं.

1 / 6
तुळजाभवानी मंदीर समोरील गेटवर खुलेआम भविकाकडून पैसे गोळा करण्याचा हा प्रकार टीव्ही 9 च्या कॅमेरात कैद झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. कोरोनाचे संकट असल्याने तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने भावीक महाद्वारवर माथा टेकून तुळजाभवानी दर्शन घेत आहेत. याचाच फायदा काही पूजारी घेत असून त्यांनी लूट सुरू केली आहे.

2 / 6
जिजाऊ महाद्वार या ठिकाणी काही पुजाऱ्यानी तुळजाभवानी मातेची प्रति मूर्ती व फोटो ठेवून भाविकांनी अर्पण केलेले पैसे लुटण्याचा धंदा सुरू केला होता. मुळात भाविकांनी अर्पण केलेले हे पैसे तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पेटी म्हणजेच दानपेटीत जमा व्हायला हवे होते. मात्र, मंदिर बंद असल्याचा गैरफायदा घेऊन काही पुजाऱ्यानी देवीचा फोटो व त्यासमोर दानपेटी ठेवत पैसे गोळा केले जात होते.

3 / 6
विशेष म्हणजे तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक निवा जैन, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त अधिकारी उपस्थित होते व त्यांची बैठक सुरू असताना हा लुटीचा धंदा सुरू होता. तुळजाभवानी मंदिर संस्थानची बैठक सुरू असतानाही भक्तांची लूट सुरू होती.

4 / 6
याचे व्हिडिओ टीव्ही 9 कॅमेरात कैद झाल्यानंतर हा प्रकार सांगताच उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार योगिता कोल्हे,सौदागर तांदळे, इंतुले यांनी कारवाई सुरू केली. तुळजाभवानी मंदिरासमोर 24 तास मंदिर प्रशासन व पोलीस विभागाचा स्वतंत्र बंदोबस्त आहे. तरी देखील या प्रकाराकडे कानाडोळा केला जात होता.

5 / 6
या प्रकारानंतर संबंधित पुजारी कोण होते ? सुरक्षारक्षक कोण होते व त्यांनी याकडे कानाडोळा का केला? याबाबत नोटीस व चौकशी करण्याचे आदेश मंदिर उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी तहसीलदार योगीता कोल्हे यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.