AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्षप्रवेश करताना शड्डू ठोकला अन् आज उमेदवारी जाहीर; डबल महाराष्ट्र केसरी लोकसभेच्या रिंगणात

Shivsena Uddhav Thackeray Group Sangli Candidate Chandrahar Patil : ठाकरे गटाने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात त्यांनी 17 उमेदवारांची नावं जाहीर केली. यात सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केला आहे. वाचा सविस्तर.....

| Updated on: Mar 27, 2024 | 1:27 PM
Share
सांगलीच्या जागेवरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत. आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली. यात चंद्रहार पाटील यांचं नाव आहे.

सांगलीच्या जागेवरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत. आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली. यात चंद्रहार पाटील यांचं नाव आहे.

1 / 5
सांगलीतील मिरजमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आयोजित संवाद महासभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी चंद्राहार पाटील हे उमेदवार असतील, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता आज त्याची अधिकृत घोषणा झाली आहे.

2 / 5
चंद्रहार पाटील यांनी दोनदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ते मागच्या कित्येक दिवसांपासून तयारी करत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. कुस्तीचं मैदान मारल्यानंतर लोकसभेच्या मैदानात ते उतरले आहेत.

3 / 5
11 मार्चला चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. याचवेळी सांगलीची जागा शिवसेनाच जिंकणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. पक्षात प्रवेश करताना शड्डू ठोकला अन् आज अखेर चंद्राहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

4 / 5
दरम्यान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने महाविकास आघाडीत नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून सांगलीतील नेते आग्रही होते. आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीत पोहचले आहेत.

5 / 5
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.