Fastag Rules : सरकराचा दिव्यांगाना दिलासा; दिव्यांग वाहनधारकांसाठी मोठी बातमी! सराकराने बदलला फास्टॅगचा हा नियम, आता दरवर्षी…..

केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती आणि PWD वाहनधारकांसाठी Exempted FASTagच्या वैधतेत मोठा बदल केला आहे. दिव्यांगत्वाच्या प्रमाणानुसार आता Exempted FASTag 3 किंवा 5 वर्षांसाठी वैध असणार आहे.

Fastag Rules : सरकराचा दिव्यांगाना दिलासा; दिव्यांग वाहनधारकांसाठी मोठी बातमी! सराकराने बदलला फास्टॅगचा हा नियम, आता दरवर्षी.....
fastag news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 2:59 PM

फास्टॅग वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेषत: दिव्यांग व्यक्तींसाठी जारी करण्यात येणार्‍या टोलमाफीच्या फास्टॅगच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. यापुढे पात्र दिव्यांग व्यक्तींना दरवर्षी फास्टॅग अपडेटसाठी फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. हा नवीन नियम २ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात आला आहे.

केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिव्यांग व्यक्ती आणि PWD वाहनधारकांसाठी मिळणाऱ्या Exempted fastag च्या नियमांमध्ये केंद्र सरकारने बदल केला आहे. यापूर्वी अशा फास्टॅगची वैधता एक वर्षासाठी असायची. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी इ अपडेट करावा लागायचा. तोच नियम सरकारने बदलल्यामुळे आता फास्टॅग च्या प्रमाणपत्राची वैधता 3 किंवा 5 वर्षाची असणार आहे.

Loading...

नवीन नियमानुसार ज्या व्यक्तींना अधिकृत कागदपत्रांमध्ये ७० टक्के ते १०० टक्के दिव्यांगत्व नोंदवले आहे, त्यांना मिळणारा Exempted fastag पाच वर्षांसाठी वैध असणार आहे. तर 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आणि 70 टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या पात्र व्यक्तीसांठी फास्टॅग ची वैधता तीन वर्षांची असेल.

या फास्टॅग साठी दिव्यांगत्वाचे प्रमाण वैध Disablitiy Certificate UDID Card किंवा लागू असलेल्या इतर अधिकृत कागदपत्रांच्या आधारे निश्चित केली जाणार आहे. तसेच सुविधा अशा वाहनांसाठी लागू आहे जी शारिरीक दिव्यांग व्यक्तींच्या वापरासाठी विशेष तयार करण्यात आली आहे.

फास्टॅग ची ठरलेली वैधता संपल्यानंतर त्याचे नुतनीकरण करता येईल. मात्र त्यावेळी संबंधित व्यक्ती पात्रतेच्या अटी पूर्ण करत असणे आणि नॅशनल हायवे ऑफ रूल्स, 2008 मधील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या बदलत्या नियमामुळे पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरवर्षी फास्टॅग च्या अपडेटसाठी करावी लागणारी प्रक्रिया कमी होणार आहे. सरकारच्या नियमानुसार या बदलाचा उद्देश राष्ट्रिय महामार्गावरील टोलमाफिची प्रक्रिया अधिक सुलभ सोपी,एकसमान आणि सुलभ करणे हा आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us