Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही… पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. शेतकरी प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात येत असलेल्या या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे.

दरम्यान, आमदार रोहित पाटील यांनीही रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाल्याचे मानले जात आहे.
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी सरकारला आणखी वेळ देण्याची भूमिका मांडली. “आज आम्ही कोणताही अल्टिमेटम देणार नाही. आजचा दिवस शांततेत जाऊ दे. सरकार काय भूमिका घेते, काय निर्णय घेते हे पाहूया. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय घेईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याची मागणी करत सुरू असलेल्या या आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.