AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपट आणि कवितांची राणी, फारुख शेख जिवलग यार, प्रकाश झा यांच्याबरोबर 17 वर्षांचा संसार, वाचा दिप्ती नवल यांच्या खास आठवणी

एकेकाळी मोठ्या पडद्यावर उठून दिसणारी अभिनेत्री दिप्ती नवल यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त काही खास आठवणींना उजाळा देऊयात...

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 8:10 AM
Share
आयेशा सय्यद, मुंबई : दिप्ती नवल या नावाने एकेकाळी हिंदी चित्रपट सृष्टीतील जाणकारांना आणि सिनेरसिकांना भूरळ घातली होती. सौदर्याचं मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या दिप्ती यांनी एकाहून एक हिट सिनेमे दिले. दिप्ती यांचा जन्म पंजाबमधल्या अमृतसरचा. पण त्यांचे वडील न्यूयॉर्क सिटी युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक होते. त्यांच्या वडिलांनी अमेरिकेचं नागरिकत्व स्विकारल्याने दिप्ती यांचं बालपण न्यूयॉर्कमध्ये गेलं. 1981 साली दिप्ती यांनी फारूख शेख यांच्यासोबत 'चश्मे बद्दूर' या सिनेमात काम केलं. हा त्यांचा पहिला सिनेमा.

1 / 5
चश्मे बद्दूर या सिनेमात दिप्ती यांनी सेल्स गर्लची भूमिका केली. या भूमिकेत दारावरची बेल वाजली की दार उघडल्यावर समोर एक सेल्स गर्ल हातात चमको नावाचा डिटर्जंट पावडरचा बॉक्स घेऊन उभी असते. या एका सामान्य भूमिकेतही दिप्ती यांचं सौंदर्य खुलून दिसत होतं. या 'चमको' नावाच्या डिटर्जंट पावडरप्रमाणेच या भूमिकेनंतर दिप्ती यांच्या करिअरलाही झळाळी मिळाली.

2 / 5
दीप्ती यांनी आतापर्यंत जवळपास ७० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. साथ-साथ, अंगूर, कथा, रंगी बिरंगी, श्रीमान श्रीमती, मिर्च मसाला, यारियां या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. सोबतच त्यांनी काही कविताही लिहिल्या आहेत. 'अजनबी रास्तों पर पैदल चलें... कुछ न कहें', अश्या भावानापूर्ण कविता त्यांनी लिहिल्या आहेत.

3 / 5
चश्मे बद्दूर, साथ-साथ या सिनेमात दिप्ती यांच्यासोबत पडद्यावर दिसले ते अभिनेते फारुख शेख. या दोघांची मैत्री कमाल होती. स्क्रीनवर जितकी ही जोडी 'एक दुजे के लिये' वाटायची तितकीच त्यांची ऑफ स्क्रीन मैत्रीही चांगली होती. फारुख यांचं निधन झालं तेव्हा दिप्ती म्हणाल्या होत्या की 'फारुख ऑनस्कीन आणि ऑफस्क्रीन माझ्या जगण्याचा भाग होते. त्यांच्या जाण्याने मला अतिव दुख: होतंय.'

4 / 5
दीप्ती यांनी 1985 मध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याशी लग्न केलं. 17 वर्षांच्य संसारानंतर 2005 मध्ये प्रकाश आणि दीप्ती यांचा घटस्फोट झाला. पण तरीही या दोघांची मैत्री मात्र कायम आहे. या दोघांनी दिशा ही मुलगी दत्तक घेतली. दिशा सध्या गायन क्षेत्रात काम करते.

5 / 5
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....