Thane

चिन्हपक्ष आघाडी/विजयी
भाजप+शिवसेना41
काँग्रेस+राष्ट्रवादी5
वंचित बहुजन आघाडी 1
अपक्ष/इतर1
एकूण48/48

सियोल : उत्तर कोरियामध्ये जवळपास चार दशकांमधील सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. याठिकाणी खाद्यपदार्थांचीही कमतरता आहे. उत्तर कोरियाची अधिकृत ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सी’ने बुधवारी (15 मे) याबाबतची माहिती दिली. यंदाच्या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये उत्तर कोरियामध्ये सरासरी 54.4 मिलीमीटर पाऊस पडला. 1982 नंतर यावेळी येथे सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सी’ने दिली. 1982 मध्ये याच काळात जवळपास 51.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.