Nana Patole यांच्यावर गुन्हा दाखल करा, Chandrashekhar Bawankule यांचं Nagpur मध्ये आंदोलन

नाना पटोले यांच्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे याप्रकरणी आंदोलन केलं. तसेच येथील पोलीस स्थानकात पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 18, 2022 | 4:21 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) भाजपला थेट अंगावर घेत आल्याचं आपण पाहतो. नाना पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राज्यातील काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. पटोले हे भाजप आणि विरोधकांवर थेट टीका करतात. मात्र, आता पटोले यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, भाजपकडूनही पटोले यांच्या या व्हिडीओवर जोरदार हल्ला चढवण्यात आलाय. दरम्यान, नाना पटोले यांच्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे याप्रकरणी आंदोलन केलं. तसेच येथील पोलीस स्थानकात पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें