AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernarth Crime : धान्यवाटप सुरु असल्याचं सांगत लुटलं! अंबरनाथमध्ये वृद्ध महिलेच्या अंगावरील 7 तोळे सोन्यासह 32 हजार रोकड लांबवली

Ambarnarth News : याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेतायत. स्थानिक लोकांची चौकशी करुन चोरट्यांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे.

Ambernarth Crime : धान्यवाटप सुरु असल्याचं सांगत लुटलं! अंबरनाथमध्ये वृद्ध महिलेच्या अंगावरील 7 तोळे सोन्यासह 32 हजार रोकड लांबवली
घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर..Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Aug 26, 2022 | 6:46 AM
Share

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernarth Crime News) एका वृद्ध महिलेला गंडा घालण्यात आलाय. धान्यवाटप सुरु असल्याचा बहाणा करत एका महिलेला भामट्यांनी लुटलं. या महिलेच्या अंगावरील सात तोळे सोन्यासह (Gold Theft) एकूण 32 हजार रुपयांची रोकड चोरट्यंना लांबवली. या घटनेप्रकरणी पोलिसांत (Ambernarth Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्ध महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर आता पोलिसांकडून भामट्यांचा शोध घेतला जातोय. या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात खळबळ उडाली आहे. सुनिता ठाणगे या महिलेसोबत हा प्रकार घडला असून सुनिता याचं वय 62 वर्ष आहे. गुरुवारी सकाळी स्टेट बँक इंडियाच्या शाखेत त्या गेल्या होत्या. तिथून परतताना त्यांच्यासोबत ही घडना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून त्यात एक जण या महिलेला धान्यवाटप सुरु असल्याची बतावणी करत असल्याचं दिसून आलंय. या चोरट्याने टोपी घातली असून त्याचा चेहराही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय.

नेमकं काय घडलं?

सुनिता ठाणगे ही 62 वर्षीय वृद्ध महिला अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात राहते. ही महिला आज सकाळी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेलली असता तिथून त्यांनी 32 हजार रुपये काढले. त्यानंतर त्या शिवाजी चौकातून भाजीपाला खरेदी करून रिक्षा पकडण्यासाठी जात होत्या. याचवेळी एक इसम त्यांच्याजवळ आला आणि पुढे एक गुजराती माणूस धान्यवाटप करत असल्याची बतावणी केली.

पाहा व्हिडीओ :

..आणि महिलेली फसवणूक!

हा भामटा या महिलेला सागर ज्वेलर्स, सॅमसंग शॉपच्या बाजूच्या गल्लीत घेऊन गेला. तिथे असलेल्या त्याच्या साथीदाराने गुजराती शेठला दागिने आवडत नसल्यानं दागिने काढून पिशवीत ठेवायला या महिलेला सांगितलं. त्यानुसार या महिलेनं 5 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, 2 तोळे वजनाची सोन्याची चैन आणि बँकेतून काढलेली 32 हजारांची रोख रक्कम या पिशवीत टाकली. हीच पिशवी घेऊन हे चोरटे पसार झाले.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेतायत. स्थानिक लोकांची चौकशी करुन चोरट्यांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. तसंच आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्यास मदत मिळते का, याचीही पाहणी आता पोलिसांकडून केली जाते आहे.

Follow Us
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?