July 3, 2019 - TV9 Marathi

26/11 च्या थरारक हल्ल्यातून वाचलेल्या डॉक्टरवर काळाचा घाला, टेम्पोने उडवलं

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आपल्या दोन मुलांसह त्यांनी प्राण गमावले. भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने नॅनो कारला उडवलं. नायगाव येथे राहणारे पास्टर डॉक्टर थॉमस उलेदर हे पत्नी मेरी आणि 10 वर्षांचा मुलगा बेनी, 5 वर्षांचा दुसरा मुलगा इझायल हे त्या नॅनो कारमध्ये प्रवास करत होते. यावेळीच हा अपघात झाला.

Read More »

इंग्लंडचंही सेमीफायनलचं तिकीट बूक, न्यूझीलंडची धाकधूक वाढली

या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला इंग्लंडने अवघ्या 186 धावात गुंडाळून 119 धावांच्या फरकाने सामना खिशात घातला. सुरुवातीला तुफान फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडची धाकधूक मात्र आता वाढली आहे. कारण, चौथ्या क्रमांकाचा संघ आता बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर ठरणार आहे.

Read More »

शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण, 100 वर्षांनंतरही ना गळती, ना धोका

रत्नागिरी जिल्ह्यात फुटलेल्या धरणाने स्थानिकांच्या डोळ्यात ठेवलं ते केवळ पाणी आणि पाणीच. याच दुर्घटनेच्या अनुशंगाने राज्यातील इतर धरणांचा आढावा घेणं गरजेचं आहे. कोल्हापुरातील राधानगरीत शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी धरण बांधलं. पण आजही ते भक्कमपणे उभा आहे.

Read More »

पाऊस पडण्यासाठी प्रार्थना, परळीत मंदिरच पाण्याने भरवलं

मान्सून उशिराने आल्याने पेरण्या खोळंबल्या. त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे चांगला पाऊस व्हावा यासाठी परळी तालुक्यातील वैद्यनाथ मंदिर परिसरातील ब्रह्मेश्वराचे मंदिर पाण्याने भरुन देवाकडे साकडं घालण्यात आलं.

Read More »

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन, फोटो लोड होण्यास अडथळा

फेसबुकवर कोणताही फोटो लोड होत नाही, तर व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरही हीच परिस्थिती आहे. व्हॉट्सअपवर फोटो डाऊनलोड होत नसल्यामुळे अनेक युझर्सने ट्विटरवर तक्रार केली आहे. डाउनडिटेक्टरच्या मते, सायंकाळपासूनच ही समस्या सुरु आहे.

Read More »

उद्योगपती बी. के. बिर्ला यांचं निधन

भारतीय उद्योग जगतातील एक महत्त्वपूर्ण चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. बसंत कुमार बिर्ला हे बिर्ला सेंचुरी टेक्सटाईल आणि इंडस्ट्रीजचे चेअरमनही होते. विशेष म्हणजे वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांनी उद्योगविश्वात काम सुरु केलं होतं.

Read More »

मुंबईच्या लोकल रेल्वेवर दररोज 75 लाख प्रवाशांचा ताण, वर्षाला हजारो मृत्यू

दररोज लाखो प्रवासी या मुंबई लोकलने प्रवास करतात. ही लोकल म्हणजे मुंबईकरांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. मात्र याच लोकलचा प्रवास किती जीवघेणा बनलाय हे काही आकडेवारी पहिल्यानंतर लक्षात येईल.

Read More »

विधानसभा निवडणूक लढवणार का? राजू शेट्टी म्हणतात….

स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. शिवाय आपण स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय स्वाभिमानीच्या कार्यकारिणीत घेण्यात आलाय.

Read More »

जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, गावकऱ्यांचं स्थलांतर, NDRF अलर्टवर

भोकरदन तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने भोकरदन तालुक्यातील धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धामणा धरणाच्या सांडव्याला मोठे तडे गेल्याने धामणा धरणाच्या भिंतीतून पाणी वाहू लागलंय.

Read More »

‘मैंने प्यार किया’तील अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक

‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला गंभीर आरोपाखाली अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आलं. भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांना सट्टेबाजी प्रकरणी अटक झाली होती.

Read More »