कोल्हापूरः गेल्या दोन दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरुन सुरु असलेल्या राजकीय चर्चेना उधान आले आहे. त्यातच एकमेकावरच्या आरोप प्रत्यारोपांवरुन जोरदार हंगामा सुरु झाला आहे. रविवारी आमदार प्रवीण दरेकर यांनीही तैलचित्रावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. तर आता कोल्हापूरातील शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी शिंदे गटाला थेट आव्हान देत नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांना निष्ठावंताचा अर्थ सांगितला आहे.
त्यांच्याबरोबरच ज्या चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत उद्धव ठाकरे सरकार उलथवून लावले होते, त्यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती आणि तैलचित्रावरुन सुरु असलेल्या राजकारणावरून संजय पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कोण साजरी करत आहे.
हे सांगताना ते म्हणाले की, निष्ठावंत आणि मातोश्रीची नाळ निस्वार्थीपणे जोडलेले शिवसैनिक जयंती साजरी करत आहेत. त्यामुळे विधानभवनात लावण्यात आलेल्या तैलचित्रावरून राजकारण करण्याची गरज नाही.
राजकारण करायचं असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बाजूला काढून मोदींचा लावा असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
यावेळी थेट त्यांनी शिंदे गटाला आव्हान देत म्हणाले की, तुमच्याबद्दल काय चीड आहे हे बघायचं असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढून दाखवा असे त्यांनी थेट आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिले आहे.
शिवसेना पक्ष सोडल्यापासून शिंदे गटाचा प्रत्येक आमदार आपण बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा असल्याचे सांगत आहे. मात्र मातोश्रीला धोका देणारे वारस कसे होऊ शकतात असा सवाल संजय पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक हेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारस असल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय पवार यांनी शिंदे गटावर टीका करताना त्यांनी नारायण राणे यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. आरोप करणाऱ्यांनी किती पक्ष बदलले आहेत हे आधी पाहावं आणि नंतर टीका करावी असा टोला त्यांनी नारायण राणे यांना लगावला आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे शिवसैनिक नसतात अशी खोचक टीकाही त्यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.
महाविकास आघाडीच्या राजकारणावर विरोधकांकडून वारंवार टीका केली जाते. त्याला प्रत्युत्तर देत ते म्हणाले की, आमचा विश्वास पक्षप्रमुखांवर आहे. महाविकास आघाडीमध्ये बेरजेचे राजकारण सुरू आहे आणि ते योग्यच आहे.
दीपक केसरकर यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी त्यांच्या वक्तव्याचं आपल्याला हसू येतं. तुम्ही पक्ष किती बदलले ते आधी सांगा नंतर टीका करा.
शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला आहे. त्यामुळे ज्यांनी दहा पक्ष बदलले आहेत त्यांनी आमच्यावर टीका करू नये असा टोला त्यांनी नारायण राणे आणि दीपक केसरकर यांना लगावला आहे.