लेकीच्या ग्लॅमरपुढे महिमा चौधरी फेल, वयाच्या 19 व्या वर्षी प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्रीची लेक….
90च्या दशकातील अभिनेत्रींनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता त्यांच्या मुली कायम चर्चेत असतात. अभिनेत्री ऐश्वर्या राय, करिष्मा कपूर जुही चावला यांच्या मुली कायम चर्चेत असतात. पण आता अभिनेत्री महिमा चौधरी हिच्या लेकीचे फोटो व्हायरल होत आहेत. आता लेकीच्या सौंदर्यापुढे महिमा हिचं सौंदर्य देखील फिकं पडलं आहे.

वयाच्या 19 व्या महिमा चौधरी हिची लेक आर्याना प्रचंड ग्लॅमरस दिसते, अभिनेत्रीच्या लेकीचं हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते देखील हैराण झाले आहे. महिमा कायम लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त महिमा हिच्या लेकीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

आर्यना चौधरी हिचा सुंदर चेहरा, देखीव डोळे, तिच्या स्माईलने तर, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. खुद्द महिमा लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सांगायचं झालं तर, स्टारकिड्सच्या काळात महिमाची लेक मात्र लाईमलाईट पासून दूर असते. आर्यना हुबेहूब तिच्या आईसारखी दिसते.

आर्यना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिमा हिने लेकीचा खास व्हिडीओ पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. आर्यना हिचा व्हिडीओ व्हायरल देखील झाला होता.

वयाच्या 19 व्या वर्षी महिमा चौधरी हिच्या लेकीचं हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिमाने सिंगल मदर म्हणून लेकीचा सांभाळ केला.

महिमा आता मोठ्या पडद्यावर पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर महिमाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.