Rohit Pawar | जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार? रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांवर थेट निशाणा

Rohit Pawar | जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार? रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांवर थेट निशाणा

| Updated on: May 16, 2026 | 2:17 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, पक्षातील बदलत्या समीकरणांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना वगळल्याची चर्चा रंगत असतानाच, या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, पक्षातील बदलत्या समीकरणांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना वगळल्याची चर्चा रंगत असतानाच, या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीतील सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाकडे “हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न” म्हणून पाहिले जात असले तरी, पवार कुटुंबातील ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार हे या प्रकरणात कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावू शकतात, असा सूर पक्षांतर्गत उमटत आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या संदर्भात बोलताना टोला लगावला. “त्यांच्यासोबत जे घडत आहे, ते योग्यच घडत आहे. राजकारणात भूमिका घेताना प्रामाणिकपणे विचारांसाठी लढणं महत्त्वाचं असतं,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, “पवार साहेबांनी त्यांना साथ दिली, पण नंतर त्यांनी दादांनाही सोडलं. जे कोणाचेच नसतात, ते कुणाचेच राहत नाहीत. त्यामुळे ते सुनेत्रा पवारांचे, सरकारचे किंवा इतर कुणाचे किती दिवस राहतील हे पाहावं लागेल,” असे वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील काही नेत्यांवर निशाणा साधला.
या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि गटबाजी पुन्हा एकदा समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

 

Published on: May 16, 2026 02:13 PM
Follow Us