AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik TCS Case Nida Khan : मोठी बातमी ! TSC कंपनी धर्मांतर प्रकरण, फरार निदा खान अखेर पोलिसांच्या ताब्यात

TCS प्रकरणातील महिला आरोपी निदा खानला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे. लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या आरोपाखाली तिच्यावर गुन्हा दाखल आहे. तिच्या अटकेमुळे प्रकरणाला गती मिळणार असून, टीसीएस प्रकरणात परदेशी फंडिंग व आंतरराष्ट्रीय कनेक्शनच्या संशयाला आता अधिक पुष्टी मिळू शकते. ती आरोपींना मदत करत असल्याचाही आरोप आहे.

Nashik TCS Case Nida Khan :  मोठी बातमी ! TSC कंपनी धर्मांतर प्रकरण, फरार निदा खान अखेर पोलिसांच्या ताब्यात
निदा खान पोलिसांच्या ताब्यात
| Updated on: May 08, 2026 | 7:30 AM
Share

नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मोठी घडामोड समोर आली आहे. या केसमधील प्रमुख आरोपींपैकू एक, कंपनीची एचआर निदा खान हिला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. न्यायालयाने निदाखान चा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर नाशिक पोलिसांनी निदा खान हिला ताब्यात घेतलं. नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला लैंगिक अत्याचारासह मानसिक छळ आणि धर्मांतराचा दबाव टाकल्या प्रकरणात निदा खानचा समावेश असल्याचे समोर आलं होतं. याप्रकरणात आत्तायपर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र निदा खान ही मात्र फरार होती.

छत्रपती संभाजीनगर येथून घेतलं ताब्यात 

सहा पुरुष आरोपींसह , निदा खान आणि कंपनीतील एच आर अश्विनी चैनानी वर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पोलिस निदा खानचा शोध घेत होते. मात्र अटक टाळण्यासाठी याचवेळी निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून निदा खानच्या शोधासाठी नाशिक पोलिसांची पथकं मागावर होती. अखेर तिला छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर तिला नाशिक शहरातील नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आणि तिथे कायदेशीर अटकेची कार्यवाही करण्यात आली.

टीसीएस कंपनीतील महिला लैंगिक अत्याचारातील आरोपींना मदत केल्याचा तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकलण्यात निदा खान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आरोप आहे. तसेच फरार असतानाही निदा खान सतत आरोपींच्या संपर्कात असल्याचही पोलीस तपासात समोर आलं होतं. अखेर आता तिला अटक करण्यात आली असून त्यामुळे याप्रकरणात पोलिसांच्या तपासाला गती मिळणार आहे. आज तिला नाशिक येथील कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.

निदा खान वर गंभीर आरोप

टीईसेस कंपनीतील छळ, धर्मांतर याप्रकरणात फिर्यादी पक्ष (एसआयटी) आणि पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात धक्कादायक खुलासे केले. टीसीएसमधील एचआर निदा खानवर पीडितेला बुरखा, धार्मिक पुस्तके पुरवल्याचा आणि तिच्या मोबाईल फोनवर इस्लामी धार्मिक ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल केल्याचा आरोप आहे.

4 आरोपी 18 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत

दरम्यान मंगळवारी नाशिक न्यायालयाने या प्रकरणातील चार मुख्य आरोपींना 18 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ह्या आरोपींमध्ये रझा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी यांचा समावेश आहे.

या प्रकरणात, विशेष तपास पथकाने (एसआयटी) २३ एप्रिल रोजी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोपीला ताब्यात घेतले होते. त्यांना यापूर्वी 5 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची कोठडी संपल्यानंतर मंगळवारी त्यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. व्ही. लाड यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, अभियोजन पक्षाने आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत सर्व चारही आरोपींना 18 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

टीसीएस कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांचे शोषण, सक्तीच्या धर्मांतराचे प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळ यांच्याशी संबंधित दाखल झालेल्या नऊ प्रकरणांची एसआयटी चौकशी करत आहे. या प्रकरणी एसआयटीने एका महिला ऑपरेशन्स मॅनेजरसह आठ जणांना अटक केली आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!