पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला, जळगाव हादरलं

जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा गावात पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. साहिल शब्बीर तडवी असं या 19 वर्षांच्या मृत तरुणाचं नाव आहे.

पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला, जळगाव हादरलं
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 21, 2025 | 5:06 PM

जळगावातून मोठी बातमी समोर येत आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा गावात पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. साहिल शब्बीर तडवी असं या 19 वर्षांच्या मृत तरुणाचं नाव आहे, तरुणाचा घातपात झाला आहे, त्याची हत्या करण्यात आली, असा संशय साहिल तडवीच्या कुटुंबाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात मृत तरुणाच्या कुटुंबीयांसह समाजबांधवांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे, घातपाताचा संशय व्यक्त करत आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत साहील तडवीच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

काय आहे नेमका आरोप 

काही दिवसांपूर्वी गावातीलच एका व्यक्तीनं कौटुंबिक वादातून मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. याच कौटुंबिक वादातून त्या व्यक्तीने काही जणांना सोबत घेऊन मुलाला मारहाण करत त्याचा खून केल्याचा संशय मृत तरुण साहिल तडवीच्या आई-वडिलांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यामुळे मृत तरुणाच्या कुटुंबातील तसेच इतर समाजबांधवांनी आज पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. आरोपींना अटक करावी, त्यांच्यावर तातडीनं कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी  मृत तरुणाच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा गावात ही घटना घडली आहे. येथील साहिल शब्बीर तडवी नावाचा तरुण गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. त्यानंतर आता त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. नेमका साहिल याचा मृत्यू कशामुळे झाला, त्याचा मृतदेह विहिरीत कसा आला? हे अद्याप अस्पष्ट आहे.

मात्र त्याच्या कुटुंबाकडून या प्रकरणात घातपात आणि हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडलं जावं, त्यांना फाशी व्हावी अशी मागणी साहिलच्या कुटुंबानं केली आहे. या प्रकरणात साहिलच्या कुटुंबानं जळगावच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.