Lamborghini Cost : भारतात लॅम्बोर्गिनी कारची किंमत किती? आकडा वाचून थक्क व्हाल!

लॅम्बोर्गिनी ही कार खूपच आलिशान आणि महागडी आहे. या कारमधून प्रवास करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. ही एक सुपरकार आहे. प्रत्येकालाच आपण आयुष्यात एकदातरी या लॅम्बोर्गिनी कारमधून फिरावे, असे वाटते.

| Updated on: Feb 12, 2026 | 9:43 PM
1 / 5
कानपूरमध्ये एका व्हीआयपी रोडवर 8 फेब्रुवारी रोजी भीषण अपघात झाला. तंबाखू व्यापाऱ्याच्या मुलाच्या लॅम्बोर्गिनी कारने चक्क सहा जणांना चिरडण्याची घटना घडली. लॅम्बोर्गिनी ही कार सर्वात महागड्या कारपैकी एक कार मानली जाते. त्यामुळेच आता ही कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कानपूरमध्ये एका व्हीआयपी रोडवर 8 फेब्रुवारी रोजी भीषण अपघात झाला. तंबाखू व्यापाऱ्याच्या मुलाच्या लॅम्बोर्गिनी कारने चक्क सहा जणांना चिरडण्याची घटना घडली. लॅम्बोर्गिनी ही कार सर्वात महागड्या कारपैकी एक कार मानली जाते. त्यामुळेच आता ही कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

2 / 5

लॅम्बोर्गिनी ही कार खूपच आलिशान आणि महागडी आहे. या कारमधून प्रवास करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. ही एक सुपरकार आहे. प्रत्येकालाच आपण आयुष्यात एकदातरी या लॅम्बोर्गिनी कारमधून फिरावे, असे वाटते. परंतु ते प्रत्येकालाच शक्य होत नाही. या कारची किंमत नेमकी किती आहे ते जाणून घेऊ या...

3 / 5

2026 सालाच्या सुरुवातीपर्यंत भारतात साधारण 800 लॅम्बोर्गिनी कार आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारतात या कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. 2024 मध्ये भारतात एकूण 113 कार विकल्या गेल्या. 2025 एकूण 111 कार विकल्या गेल्या. भारतात Urus SUV ही लॅम्बोर्गिनी कार सर्वाधिक विकली जाते.

4 / 5

त्यानंतर लॅम्बोर्गिनी कारचे Huracán हे मॉडेल विकले जाते. तुम्हाला भारतात आज नवी लॅम्बोर्गिनी कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला 4.18 ते 4.47 कोटी रुपये मोजावे लागतील. Urus या मॉडेलची ही किंमत आहे. दिल्ली, मुंबईमध्ये या कारची ऑनरोड किंमत पाच कोटी रुपयांच्या घरात जाते.

5 / 5

या कारची सर्व्हिसिंग कॉस्टही जास्त आहे. कारचे मेन्टेनन्स, सर्व्हीस, इन्शुरन्स यासाठीही दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागतात. ही कार तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. 25 ते 30 वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींकडे ही कार असण्याचे प्रमाण जास्त आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us