Phaltan Doctor Death : मानसिक छळ अन् 4 वेळा माझ्यावर… फलटणमध्ये महिला डॉक्टरचं टोकाचं पाऊल; पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पी.एस.आय. गोपाल बदने यांनी चार वेळा अत्याचार केल्याचा आणि पोलीस प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर महिलेने आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमध्ये तिने पी.एस.आय. गोपाल बदने यांच्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे, तर पोलीस प्रशांत बनकर यांनी मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉक्टर महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी या दोन अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा संपूर्ण प्रकार मानसिक छळ आणि अत्याचाराचा आरोप असलेल्या घटनेमुळे अधिक गंभीर बनला आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

