AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभ्यासात लक्ष नाही? तुमच्या मुलाला ‘ब्रिलियंट’ बनवण्यासाठी पालकांनी करावेत हे ५ सोपे उपाय!

नवीन पिढीला अभ्यासाकडे वळवणं हे आजच्या पालकांसमोरचं एक गंभीर आव्हान बनलं आहे. सतत मोबाईल, सोशल मिडिया आणि टीव्हीच्या आहारी गेलेली मुलं अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. थोडा वेळ पुस्तकांमध्ये घालवला तरी लगेच कंटाळा येतो, लक्ष भरकटतं आणि पूर्वी शिकलेली माहितीही आठवत नाही. अशा वेळेस पालक अस्वस्थ होतात. जर तुमच्याही घरात अशी परिस्थिती आहे, तर हे उपाय नक्कीच उपयुक्त ठरतील.

अभ्यासात लक्ष नाही? तुमच्या मुलाला 'ब्रिलियंट' बनवण्यासाठी पालकांनी करावेत हे ५ सोपे उपाय!
student
| Edited By: | Updated on: Jun 19, 2025 | 10:00 PM
Share

आजच्या डिजिटल युगात मुलांना अभ्यासात रूची निर्माण करणे हे पालकांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. अनेक वेळा अभ्यास सुरू करताच लक्ष विचलित होणं, किंवा काही वेळाने लक्ष न लागणं, पूर्वी शिकलेली गोष्ट विसरणं अशा समस्या अनेक घरांमध्ये दिसून येतात. जर तुमच्या घरातही अशीच परिस्थिती असेल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

मुलांचे लक्ष अभ्यासात लावणे आणि त्यांची स्मरणशक्ती वाढवणे हे कोणत्याही आईवडिलांसाठी आज अत्यंत आवश्यक आहे. फोर्स करून किंवा रागवून अभ्यास करवणे हा एक टिकाऊ उपाय नाही. मुलांना अभ्यासासाठी प्रेरित करण्यासाठी आणि त्यांच्यात सातत्य निर्माण करण्यासाठी काही सकारात्मक सवयी लागतात. त्यासाठीच खाली दिलेले ५ खास उपाय तुमच्या उपयोगाचे ठरू शकतात.

1. एक ठराविक रूटीन तयार करा

मुलांना दररोज एकच वेळेवर अभ्यासाची सवय लावणं आवश्यक आहे. कितीही काम असलं तरी फक्त शाळा किंवा ट्यूशनवर विसंबून राहू नका. दररोजच्या वेळेनुसार अभ्यास होईल याची खबरदारी घ्या. अशा प्रकारे सातत्याने अभ्यास केल्यास त्यांना स्वयं-अनुशासनही शिकायला मिळेल.

2. शांत आणि एकाग्रता वाढवणारा अभ्यासाचा माहोल द्या

मुलांना अभ्यास करताना घरात शांतता राखणं खूप गरजेचं आहे. टीव्ही, मोबाईल किंवा मोठ्या आवाजात गप्पा यामुळे त्यांचं लक्ष सहज विचलित होतं. त्यामुळे जेव्हा ते अभ्यासात बसतील, तेव्हा संपूर्ण घरात एक शांत वातावरण ठेवा. यामुळे त्यांना शिकलेली माहिती दीर्घकाळ लक्षात राहील.

3. अभ्यास छोटे भाग करून करून शिकवा

एका बैठकीत चार-पाच तास अभ्यास करणे अवघड असते. त्याऐवजी अभ्यासाचे छोटे-छोटे भाग करा आणि प्रत्येक टप्प्यानंतर थोडासा ब्रेक व कौतुक द्या. हे तंत्र मुलांचं मनोबल वाढवतं आणि त्यांना कंटाळा न येता अभ्यास करता येतो.

4. व्हिज्युअल फॉरमॅट वापरा

अभ्यासात बदल करण्यासाठी पुस्तकी पद्धती ऐवजी फोटो, व्हिडीओ किंवा इंटरेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज वापराव्यात. काही मुलांना सतत लिहायला लागल्याने कंटाळा येतो, त्यामुळे संकल्पना व्हिज्युअली समजावल्यास त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजते.

5. नियमित पुनरावृत्ती (रिवीजन) आवश्यक

दररोज नवीन धडे शिकवण्याऐवजी मागील शिकवलेली माहिती पुन्हा एकदा समजावून सांगितली पाहिजे. यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीला चालना मिळते आणि परीक्षेच्या वेळी तणाव कमी होतो.

शेवटी सांगायचं झालं, तर…

मुलं चांगली शिकण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, संयम, आणि सकारात्मक वातावरणाची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांच्यावर ओरडण्याऐवजी त्यांना समजून घेऊन, वर सांगितलेल्या पद्धती वापरल्यास ते निश्चितच ‘ब्राईट स्टुडंट’ बनू शकतात. शिक्षणाला कंटाळवाणं न वाटता, आनंददायी कसं करता येईल यावर लक्ष द्या

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.