AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Shah आज पुण्यात, वाहतूक मार्गात काय बदल केलेत ते जाणून घ्या

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात आहे. त्यांच्या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत, त्या बद्दल जाणून घ्या. त्याशिवाय राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आलाय. त्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आहे.

Amit Shah आज पुण्यात, वाहतूक मार्गात काय बदल केलेत ते जाणून घ्या
amit shah
| Updated on: Jul 04, 2025 | 9:15 AM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात आहेत. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आलाय. या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांचा, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्या अनावरणासह प्रशिक्षणार्थी कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबर शाह संवाद साधणार आहेत.

तसेच कोंढवा बुद्रुक येथे जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरलाही ते भेट देणार असून, बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी शहा यांच्याकडून शुक्रवारी करण्यात येणार आहे. पीएमएचआरसी हेल्थ सिटीच्या भूमिपूजन समारंभासही शाह उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यातील येरवड्यातील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. अमित शाहंच्या दौऱ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

पुण्यात वाहतूक मार्गात काय बदल केलेत?

अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त पुणे शहरातील काही भागात वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा खडीमशीन चौक ते कात्रज चौक यादरम्यान सर्व मालवाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. बंडगार्डन वाहतूक विभागातील मोर ओढा सर्किट हाऊस चौक ते आयबी चौक दरम्यानचे वाहतूक एकरी आवश्यकतेनुसार सूत्रपा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलीय.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.