AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Teachers day Special : दोन विद्यार्थी बनले आयएएस अन् IAS अधिकारी झाले शिक्षक

Pune Teachers day Special : देशभरात आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहे. या कार्यक्रमांमधून शिक्षकांसंदर्भात कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. काय घडले नेमके पुणे परिसरात...

Teachers day Special : दोन विद्यार्थी बनले आयएएस अन्  IAS अधिकारी झाले शिक्षक
pcmc Municipal Commissioner Shekhar SinghImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 05, 2023 | 12:36 PM
Share

पुणे | 5 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात नेहमी वेगवेगळे प्रयोग केला जातात. ५ सप्टेंबर हा देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असताना पुणे शहरात कार्यक्रम होत आहे. अधिकारी किती मोठा झाला तरी तो आपल्या शिक्षकांसंदर्भात नेहमी कृतज्ञ असतो. आपल्या गुरुजनांसंदर्भात आदर व्यक्त करण्यासाठी पिंपरी, चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी मंगळवारी वेगळीच भूमिका घेतली. त्यांच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा सुरु आहे आणि विद्यार्थीही खूश झाले आहेत.

काय केले आयुक्तांनी

शिक्षक दिनाचे निमित्त साधून पिंपरी, चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंग महानगरपालिकेच्या शाळेत पोहचले. मग त्यांनी या ठिकाणी शिक्षकांची भूमिका सुरु केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिकवणेही सुरु केले. त्याचवेळी शाळेतील करण काकडे आणि अपेक्षा माळी या दोन विद्यार्थ्यांना आयएएस अधिकारी होण्याची सुवर्ण संधी दिली. हे विद्यार्थी इंद्रायणी नगर आणि काळेवाडी शाळेतील होते.

अन् मिळाला जोरदार सॅल्यूट

करण काकडे आणि अपेक्षा माळी विद्यार्थी आयएएस अधिकाऱ्याच्या गाडीने पिंपरी, चिंचवड मनपात गेले. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना दमदार सॅल्यूट ठोकला आणि ते आयुक्तांच्या दालनात गेले. मग या आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कार्यालयात करण आणि अपेक्षा गेले. त्या ठिकाणी त्यांनी आढावा घेतला. किती कर्मचारी काम करतात, ही माहिती घेतली.

अन् आयुक्तांनी बजावली ही भूमिका

आयुक्त विद्यार्थी झाले असताना आयुक्त असलेले शेखर सिंग शिक्षक झाले. आज मी शिक्षक झालो आणि तुम्ही अधिकारी झाले याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी विचारणा केली. या प्रसंगासंदर्भात बोलताना शेखर सिंग म्हणाले, शिक्षक होण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. यावेळी मी विद्यार्थ्यांना भारताच्या चांद्रयान प्रकल्पाची माहिती दिली. त्यावेळी अनेक मुलींनी मला आपण शास्त्रज्ञ होणार असल्याचे सांगितले. तसेच शिक्षण प्रणालीत बदल करण्यासंदर्भात काही सूचनाही विद्यार्थ्यांनी केल्या. या अनुभवामुळे माझ्याही विद्यार्थी असतानाच्या आठवणी जागृत झाल्या.

Follow Us
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात...
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला