AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : तुमच्या पत्रिकेमध्ये असेल शनीदोष तर महाशिवरात्रीला अवश्य करा हे उपाय

पौराणिक कथेनुसार भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. भोलेनाथांनी शनिदेवाला सांगितले होते की तू माझ्या भक्तांवर वक्रदृष्टी ठेवणार नाहीस. त्यामुळे शिवभक्त शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्त राहतात.

Astrology : तुमच्या पत्रिकेमध्ये असेल शनीदोष तर महाशिवरात्रीला अवश्य करा हे उपाय
महाशिवरात्रीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 15, 2023 | 3:58 PM
Share

मुंबई, भोलेनाथाच्या पूजेला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण ज्योतिषशास्त्रातही (Astrology) ती खूप फलदायी मानली गेली आहे. यंदा महाशिवरात्री (Mahashivratri 2023) हा सण 18 फेब्रुवारीला साजरा होणार आहे. या दिवशी वर्षांनंतर एक दुर्मिळ योग देखील तयार होत आहे, ज्यामध्ये शिवाची पूजा केल्याने शनिदेवाची विशेष आशीर्वादही प्राप्त होणार आहे. पौराणिक कथेनुसार भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. भोलेनाथांनी शनिदेवाला सांगितले होते की तू माझ्या भक्तांवर वक्रदृष्टी ठेवणार नाहीस. त्यामुळे शिवभक्त शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्त राहतात.

महाशिवरात्रीचा दुर्मिळ योगायोग

यंदा महाशिवरात्रीचा उत्सव शनिवारी आहे. शनि त्रयोदशी तिथी म्हणजेच शनि प्रदोष व्रत देखील याच दिवशी पाळले जाते. प्रदोष व्रत आणि शिवरात्री दोन्ही शिवाला अतिशय प्रिय आहेत. अशा स्थितीत या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने दोन्ही व्रताचे फळ मिळेल. या दिवशी शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान आहेत. अशा स्थितीत शनि प्रदोषाचे व्रत केल्यास त्यांचे अशुभ परिणाम कमी होऊन शुभ परिणाम वाढतात. असं असलं तरी शनिदेवाच्या दर्शनाचा शिवभक्तांवर काहीही परिणाम होत नाही, असं मानलं जातं. अशा स्थितीत महाशिवरात्रीला केलेली पूजा शिव आणि शनी या दोघांशी संबंधित फल देईल.

काय करायचं?

  1. शनीला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीला शिवलिंगावर शमीपत्र अर्पण करा आणि महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे शनीची महादशा, साडेसाती आणि अडिचकी आराम मिळेल.
  2. महाशिवरात्रीच्या दिवशी गंगेच्या पाण्यात काळे तीळ टाकून महादेवाचा रुद्राभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळी शिव सहस्रनामाचा जप करावा. यामुळे शनिदोषाचा प्रभाव कमी होईल.
  3. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर बेलपत्राच्या झाडाखाली गरीब किंवा ब्राह्मणांना खीर खाऊ घालावी. तसेच शिव चालिसाचे पठण करावे.
  4. शिवलिंगावर रोज बेलपत्र आणि शमीची फुले अर्पण करा. यामुळे शनिदोषापासून लवकर आराम मिळतो.
  5. महाशिवरात्रीच्या दिवशी काळी उडीद डाळ, काळे तीळ, मोहरीचे तेल दान करा. यामुळे शनिदेवाच्या त्रासापासून आराम मिळतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी