सुभाष देसाईंनी नारायण राणेंचं नाव टाळलं! देशातील नंबर एक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख

सुभाष देसाईंनी नारायण राणेंचं नाव टाळलं! देशातील नंबर एक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 09, 2021 | 3:26 PM

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी देसाईंनी नारायण राणेंचं नाव घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

चिपी विमानतळाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित झाले होते. यावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी देसाईंनी नारायण राणेंचं नाव घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

अनेकांनी या विमानतळाच्या उद्घाटनाला उशीर झाल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, पायगुण लागतो म्हणतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन होत आहे, असंही देसाई म्हणाले. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विमानतळासाठी लागण्याचा प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा ते करत राहिल्याचं देसाईंनी सांगितलं. चिपी विमानतळाचा द्रोणागिरी उचलण्यासाठी अनेकांचा हातभार लाभला. त्यात मी ही एक बोट लावलं. कोकणाच्या, आपल्या दृष्टीनं हा आनंदाचा सण आपण साजरा करत आहोत. आता कोकणवासियांची सर्व स्वप्न साकार होतील, असंही देसाई यावेळी म्हणाले.

Published on: Oct 09, 2021 2:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us