AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron Effect: सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?

जगासह देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) संकटाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमिक्रॉन (Omicron) हा अधिक घातक असल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) देण्यात आल आहे. याचा परिणाम हा सोन्याच्या किमतीवर झाल्याचे पहायला मिळत आहे.

Omicron Effect: सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?
सोने
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 12:32 PM
Share

नवी दिल्ली: जगासह देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) संकटाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमिक्रॉन (Omicron) हा अधिक घातक असल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) देण्यात आल आहे. कोरानाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम शेअर मार्केटसह सर्वच बाजारपेठेवर झाला आहे. कोरोन वाढीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव देखील वधारले आहेत. सोन्याच्या दर प्रति ग्रॅम 219 रुपयांनी वाढले आहेत.

सोने प्रति तोळा 47,640 वर

आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 219 रुपयांनी वाढून  47,640 वर पोहोचले आहेत. कमोडिटी बाजार तज्ज्ञांच्या मते सध्या जगावर कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉन या विषाणूचे सावट आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील काही दिवस सोन्याच्या दरामध्ये तेजी राहु शकते, दुसरीकडे वाढती महागाई, डॉलरच्या तुलनेमध्ये घसरलेला रुपया अशा कारणांमुळे देखील सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान येणाऱ्या काळात सोन्याच्या दरामध्ये आणखी तेजी येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अल्पकालावधीसाठी सोन्यामध्ये केलेली गुंतवणुक अधिक नफा मिळून देऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

…तर होऊ शकतो फायदा

येणाऱ्या काळात सोन्यामध्ये गुंतवणुक केल्यास फायदा होऊ शकतो का याबाबत बोलताना मोलीलाल ओसवाल कमोडिटी सिसर्चचे उपाध्यक्ष अमित सजेजा यांनी म्हटले आहे की, सध्या सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन हे आहे. ओमिक्रॉनमुळे मार्केटवर पुन्हा एकदा दबाव निर्माण झाल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. सोबतच महागाई आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमुल्य ही देखील प्रमुख कारणे आहेत. येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर अल्प कालावधीसाठी सोन्यामध्ये गुंतवणुक केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. पुढील महिन्यापर्यंत सोने प्रति तोळा 49 हजारांवर पोहचण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरात चढउतार

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने प्रति तोळा 56 हजारांवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट झाली. सोन्याचे दर झपाट्याने कमी होत असल्याने अनेकांनी सोन्यामधील गुंतवणूक काढली होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैस, आपल्या मुलीचे भविष्य करा अधिक सुरक्षीत

Multibagger Penny Stock: 3 महिन्यांत 1200 टक्के परतावा, 1 लाख रुपयांचे झाले 13 लाख

डिसेंबरपासून LPG सबसिडी पूर्ववत होणार; कोणाला फायदा मिळणार?

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश