Virat kohli : विराट कोहलीचा आणि युजवेंद्र चहलच्या बायकोचा हा नाद खुळा डान्स पहा, व्हिडिओ तुफान व्हायरल

| Updated on: Nov 26, 2021 | 3:11 PM

विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने हा व्हिडिओ 'बिहाइंड द सीन' या कॅप्शनखाली शेअर केला आहे. त्यात धनश्री विराटला हूक स्टेप शिकवताना दिसून येतेय.

Virat kohli : विराट कोहलीचा आणि युजवेंद्र चहलच्या बायकोचा हा नाद खुळा डान्स पहा, व्हिडिओ तुफान व्हायरल
Virat Kohli
Follow us on

भारताच्या क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली नेहमी चर्चेत असतो. आता विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत विराट कोहली स्पिनर युझवेंद्र चहलची बायको धनश्रीसोबत थिरकताना दिसून आलाय. युझवेंद्र चहलची बायको आणि युझवेंद्र चहल दोघेही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात.

विराटच्या डान्सवर चाहते फिदा

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री उत्तम डान्सर आहे. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. याआधीही ती टीम इंडियातील अनेक क्रिकेटरसोबत डान्स करताना सोशल मीडियावर दिसून आली. मात्र यावेळी ती टीम इंडियाच्या कॅप्टनसोबतच ठुमके लावताना दिसून येतेय. विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओवर चाहत्यांच्या लाईक, कमेन्टचा पाऊस पडतोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने हा व्हिडिओ ‘बिहाइंड द सीन’ या कॅप्शनखाली शेअर केला आहे. त्यात धनश्री विराटला हूक स्टेप शिकवताना दिसून येतेय.

 

धनश्रीचे युट्यूबला 25 लाख सबस्क्राईबर

धनश्रीचं युट्यूब चॅनलही आहे. तिच्या सबस्क्राईबरची संख्या 26 लाखांच्या आसपास आहे. धनश्री बॉलीवूडच्या गाण्यांनाही रिक्रिएट करते. त्यामुळे सोशल मीडियावर ती नेहीमी चर्चेत असते. धनश्री एक उत्तम कुरिओग्राफरही आहे. ती अनेकांना हीप- हॉपही शिकवते. त्यामुळे तीचे डान्सचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात. आणि या व्हिडिओत तर ती खुद्द विराट कोहलीला डान्सच्या टीप्स देतेय. त्यामुळे  या व्हीडिओची जोरदार चर्चा आहे. युझवेंद्र चहल आणि विराट कोहली टीम इंडियाबरोबरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळतात. त्यामुळे त्यांच्यात कौटुंबीक मैत्रीही चांगली आहे.

आता मुंबईतील ‘या’ आठ मॉल्समध्ये रात्रीची पार्किंग करा; वाहन मालकांना मोठा दिलासा

भाजप पदाधिकारी अमोल इघे हत्या प्रकरण, संशयित आरोपी महिन्याभरापूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत?

Jalna | जालना एपीएमसी कार्यालयावर ईडीचा छापा, 10 ते 12 ठिकाणी ईडीची छापेमारी