AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या सेवेसह एसटी महामंडळ आता शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार!

मुंबई : प्रवाशांना विविध सेवा देणारं एसटी महामंडळ आता मालवाहतूक सेवा सुरु करणार आहे. महामंडळाचं उत्पन्न वाढविणे आणि प्रवाशांना स्वस्त दरात सेवा देणे यासाठी एसटी महामंडळाकडून कल्पक योजना राबवली जात आहे. गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे. स्वतंत्र वाहनांद्वारे मालवाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर 301 गोदामांची निर्मिती करणे याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासमोर सादरीकरण […]

नव्या सेवेसह एसटी महामंडळ आता शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM
Share

मुंबई : प्रवाशांना विविध सेवा देणारं एसटी महामंडळ आता मालवाहतूक सेवा सुरु करणार आहे. महामंडळाचं उत्पन्न वाढविणे आणि प्रवाशांना स्वस्त दरात सेवा देणे यासाठी एसटी महामंडळाकडून कल्पक योजना राबवली जात आहे. गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे. स्वतंत्र वाहनांद्वारे मालवाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर 301 गोदामांची निर्मिती करणे याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आलं.

एसटी महामंडळाची मालवाहतूक सेवा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचं रावतेंनी सांगितलंय. प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. आतापर्यंत दुर्लक्षीत असलेल्या मालवाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलाय. रेल्वे मालवाहतुकीच्या धर्तीवर आता एसटीचीही मालवाहतूक सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय.

रेल्वेला मालवाहतुकीतून मोठा फायदा होतो, ज्यामुळे प्रवाशांना स्वस्त दरात चांगल्या सुविधा देता येतात. पण एसटीची ही सेवा आतापर्यंत चालू नव्हती. परिणामी प्रवाशांना सेवा देताना मोठा भुर्दंड सहन करावा लागतो, शिवाय उत्पन्नही अत्यंत कमी असतं.

एसटी महामंडळाच्या मालवाहतूक सेवेसाठी स्वतंत्र वाहने वापरण्यात येतील. सध्याच्या वापरातील प्रवासी वाहनांच्या नऊ वर्षानंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून मालवाहतूक वाहनांमध्ये त्याचं रुपांतरण करण्यात येईल.

कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी अशा सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक करण्यात येईल. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल शहरी बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याच्या कामी या सेवेचा वापर करण्यात येईल, असे रावते यांनी सांगितलं. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने सादरीकरण केलं. सादर केलेल्या प्रस्तावात काही सुधारणा सूचविण्यात आल्या असून हा प्रस्ताव लवकरच अंतिम करण्यात येईल. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी यांना व्यापारी लूट थांबून किफायतशीर दरात हक्काचे मालवाहतूक साधन मिळेल, असं रावतेंनी सांगितलं.

महामंडळाच्या मालवाहतूक सेवेत रेशन धान्य, पोषण आहाराचे धान्य यांची वाहतूक करण्याचंही प्रस्तावित करण्यात आलंय. यासाठी महामंडळाच्या साधारण तीन हजार जुन्या प्रवासी बसेसचे मालवाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येईल. काही नवीन मालवाहतूक वाहने खरेदी करण्याचेही प्रस्तावित करण्यात आलंय.

राज्यातील 301 ठिकाणी गोदामे बांधता येऊ शकतील, असं रावतेंना सादरीकरणातून सांगण्यात आलं. तीन टप्प्यांमध्ये या गोदामांची बांधणी करुन ती लोकांसाठी आणि विशेषत: शेतकऱ्यांच्या मालाच्या साठवणुकीसाठी उपलब्ध करुन देण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे.

मालवाहतूक आणि गोदामे यांचे संनियंत्रण करण्यासाठी महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक हे नवीन पद निर्माण करण्यात येणार आहे. स्वतंत्र विभाग आणि स्वतंत्र कर्मचारी वर्गही नियुक्त करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...