AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद : संपात सहभागी झालेल्या 12 जणांवर कारवाई; निलंबित केल्याने एसटी कर्मचारी आक्रमक

आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी  कर्मचारी संपावर आहेत. दरम्यान संपात सहभागी झालेल्या औरंगाबाद आगारातील 12 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

औरंगाबाद : संपात सहभागी झालेल्या 12 जणांवर कारवाई; निलंबित केल्याने एसटी कर्मचारी आक्रमक
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 8:03 AM
Share

औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी  कर्मचारी संपावर आहेत. दरम्यान संपात सहभागी झालेल्या औरंगाबाद आगारातील 12 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यातील  तीन जणांना बडतर्फ करण्यात आले आहे, तर 9 जणांना निलंबित करण्यात आले. यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसह स्थाई कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

आज बैठक

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज 11 वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. आजचा दिवस हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा असून, या बैठकीमध्ये संपावर तोडगा निघेल  अशी अपेक्षा आहे. दरम्यान त्यापूर्वी  मंगळवारी आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये तब्बल दोन तास बैठक झाली.

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या

राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलनिकरण करण्यात यावे. एसटी कर्मचाऱ्यांना क वर्गाचा दर्जा देण्यात यावा. वेतनवाढीसह घरभाडे भत्ता आणि महागाई भत्त्यात वाढ करावी अशा विविध मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. आपल्या मागण्यांसाठी त्यांचे गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळे बससेवा ठप्प झाली असून, प्रवाशांचे हाल होत आहेत. विशेष: ग्रामीण भागात संपाचा मोठा फटका बसला असून, दळणवळण ठप्प झाले आहे.

संबंधित बातम्या 

Aurangabad: जायकवाडीत दुर्मिळ ‘युरेशियन कर्ल्यू’चं आगमन, जगात फक्त 7 हजार पक्षी शिल्लक

तर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा, सोमय्यांचे थेट ठाकरे सरकारलाच आव्हान

जे न देखे रवी, ते देखे कवीः साहित्य संमेलनात नवलच; गीतामध्ये लोकहितवादींच्या जागी नाना शंकरशेठांचा फोटो

Follow Us
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...