AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूरमध्ये राधा पाटीलच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ, किरकोळ वादातून हाणामारी,यात्रेला गालबोट!

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात राधा पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ वादातून थेट हाणामारी झाली आहे.

पंढरपूरमध्ये राधा पाटीलच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ, किरकोळ वादातून हाणामारी,यात्रेला गालबोट!
| Updated on: May 06, 2026 | 1:05 PM
Share

Radha Patil Video : गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील आणि राधा पाटील यांच्या डान्सची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. गावात सुरू असलेल्या यात्रेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात शेवटच्या टप्प्यात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.

सुस्ते गावात यात्रेच्या पार्श्वभूमीवर राधा पाटील हिचा भव्य नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरळीत सुरू होता आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. सुरुवातीला शब्दांत सुरू झालेला वाद काही वेळातच मारामारीत बदलला.

पोलिसांची तात्काळ कारवाई

वाद वाढत गेल्याने संबंधित तरुणांमध्ये धक्काबुक्की, आरडाओरडा आणि शिवीगाळ सुरू झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर काही जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या गोंधळामुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. वाढता तणाव पाहता आयोजकांनी राधा पाटील हिचा कार्यक्रम तात्काळ बंद केला. पोलिसांनी गर्दी पांगवून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

दोन दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम

विशेष म्हणजे, याच सुस्ते गावात दोन दिवसांपूर्वी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रचंड गर्दी होऊनही कार्यक्रम पूर्णपणे शांततेत पार पडला होता. त्यामुळे दोन कार्यक्रमांमधील परिस्थितीतील हा फरक चर्चेचा विषय ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील दोन वेगवेगळ्या राजकीय गटांनी स्वतंत्रपणे हे कार्यक्रम आयोजित केले होते. एका गटाने गौतमी पाटील हिचा तर दुसऱ्या गटाने राधा पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या घटनेला कोणताही राजकीय रंग नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.

किरकोळ कारणावरून झालेल्या या वादामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आणि यात्रेच्या वातावरणाला गालबोट लागले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम