AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्ट जन. डॉ. माधुरी कानिटकर

लेफ्ट. जन. डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या. विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारताना मला आनंद होत आहे. विद्यापीठ हे शिक्षणाचे केंद्र आहे. यामध्ये विविध विषयांवर संशोधन व उपक्रम होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करून कामकाज करणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्ट जन. डॉ. माधुरी कानिटकर
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी स्वीकारला.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Nov 02, 2021 | 3:12 PM
Share

नाशिकः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून स्वीकारला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीकरिता शासनाकडून शोध समिती गठीत करण्यात आली होती. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रभारी पदाचा कार्यभार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे होता. कुलपती कार्यालयाने आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची निवड केली आहे. त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. यामुळे लेफ्ट. जन. डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या. विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारताना मला आनंद होत आहे. विद्यापीठ हे शिक्षणाचे केंद्र आहे. यामध्ये विविध विषयांवर संशोधन व उपक्रम होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करून कामकाज करणार आहे. यामुळे अल्प, मध्यम अणि दीर्घ मुदतीत विद्यापीठाच्या एकूणच कामकाजाची दिशा ठरवली जाणार आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सक्षमतेने पोहचणे शक्य होणार आहे. आरोग्य शिक्षण क्षेत्रात कोविड-19 च्या काळात आलेल्या अडचणींची पुनरावृती होऊ नये यासाठी व्यापक प्रमाणात बदलाची गरज आहे. यासंदर्भात विषयतज्ज्ञ व त्या-त्या क्षेत्राशी निगडीत लोकांचा सल्ला आाणि मार्गदर्शनाने कार्याची वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन विद्यापीठाचे प्रमुख ध्येय असून त्या अनुषंगाने विशेष कार्य केले जाणार आहे. अंतर विद्याशाखा संशोधनावर भर दिला जाणार आहे. रुग्णाला पूर्ण बरे करण्यासाठी सर्वसमावेशक उपचार पद्धतीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने विद्यार्थी घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, प्रभारी कुलगुरूपदाच्या कारकीर्दीत आरोग्य शिक्षणाच्या विविध प्रशासकीय बाबींचा अभ्यास करता आला. विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठीचे काम, विविध बैठका, चर्चासत्र व उपक्रम यात सहभाग, परीक्षा कालावधीत कोविड-19 च्या परिस्थितीत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यांचा उल्लेख महत्त्वपूर्ण आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र राज्यभर आहे तसेच कमी मनुष्यबळ असताना चोख होणारे कामकाज उल्लेखनीय आहे. आरोग्य शिक्षणाची जागतिक भरारी विद्यापीठाने घेतली असून नवनियुक्त कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या मार्गदर्शनाने विद्यापीठाच्या कार्याला नवी दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगीतले की, विद्यापीठाचे नवनियुक्त मा. कुलगुरु लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचे विद्यापीठ परिवाराच्या वतीने स्वागत करतो. मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचे प्रशासकीय कामकाजात मार्गदर्शन लाभले. त्यांचा विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामाचा अनुभव नेहमीच प्रेरणा देईल. शैक्षणिक व संशोधन कार्यात विद्यापीठ नावलौकिक मिळवत आहे. विद्यापीठाचा जागतिक स्तरावर दर्जा उंचावण्यासाठी मा. कुलगुरु लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त संशोधन व समाजाभिमुख उपक्रम राबवू असे त्यांनी सांगितले. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी आभार मानले. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी लेफ्ट. जनरल (निवृत्त) डॉ. राजीव कानिटकर, डॉ. पद्मजा कानिटकर, वित्त व लेखाधिकारी नरहरी कळसकर, पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, डॉ. सुरेश गोसावी, कर्नल अनिमेश, डॉ. श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते. (Left Jan as the Vice Chancellor of Maharashtra University of Health Sciences. Dr. Madhuri Kanitkar)

इतर बातम्याः

कोणताही शत्रू शुद्र नसतो, पंकजांचे नाशिकमध्ये सूचक वक्तव्य, त्यांच्या मनात सल आहे तरी काय?

Nashik weather: उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतरच; दक्षिण महाराष्ट्रात मात्र ऐन दिवाळीत धारानृत्य!

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप