AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board SSC Result 2026 Date : मोठी बातमी! इयत्ता 10 वीच्या निकालाची तारीख आली, या दिवशी लागणार रिझल्ट, असा चेक करा तुमचा रिझल्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल येत्या 8 मे रोजी लागणार आहे.

Maharashtra Board SSC Result 2026 Date : मोठी बातमी! इयत्ता 10 वीच्या निकालाची तारीख आली, या दिवशी लागणार रिझल्ट, असा चेक करा तुमचा रिझल्ट
ssc result Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2026 | 7:48 PM
Share

SSC Result 2026 : गेल्या अनेक दिवसांपासून इयत्ता दहावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहात होते. निकाल लागल्यानंतर इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू होते. त्यामुळे या निकालाकडे विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचेही लक्ष लागलेले आहे. दरम्यान, आतार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नेमका कधी लागणार, याची तारीख आता समोर आली आहे. खुद्द शिक्षण मंडळानेच ही तारीख घोषित केली असून येत्या 8 मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे.

शिक्षण मंडळाने जारी केलेल्या निवेदनानुसार इयत्ता दहावीचा निकाल 8 मे रोजी जाहीर केला जाईल. दुपारी एकवाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईनच दिसणार आहेत. खालील संकेतस्थळांना भेट दिल्यावर विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयातील तसेच एकूण गुण पाहता येणार आहेत.

या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल

1. https://results.digilocker.gov.in

2. https://mahahsscboard.in

3. https://sscresult.mkcl.org

6. https://www.tv9marathi.com

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी )परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०९/०५/२०२६ ते शनिवार, दिनांक २३/०५/२०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.

फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंबकरून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून-जुलै २०२७) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?