AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur एसटी महामंडळाची सर्वात मोठी कारवाई, 200 कर्मचार्‍यांचे निलंबन

नागपुरातीलही एसटीचे चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिक हे संपावर गेले. यामुळे नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकासह इतर आगारातून आजतागायत एकही बस बाहेर पडली नाही. परिणामी महामंडळाचा साडेनऊ कोटीहून अधिकचा महसूल बुडाला आहे.

Nagpur एसटी महामंडळाची सर्वात मोठी कारवाई, 200 कर्मचार्‍यांचे निलंबन
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 28, 2021 | 5:42 PM
Share

नागपूर : एस महामंडळाचे कर्मचारी अद्याप कामावर रुजूच झाले नाहीत. त्यामुळं प्रशासनाकडूनही कारवाईचा सपाटा सुरूच आहे. शनिवारी महामंडळाकडून तब्बल 200 कर्मचार्‍यांचं निलंबन करणऱ्यात आलं. तरीही कर्मचारी कामावर रुजू व्हायला तयार नाहीत.

राज्य शासनानं कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये वाढ करूनही एसटी महामंडळाचं कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांचा संप सुरूच आहे. यामुळं राज्यातील विविध आगारातून शनिवारलाही बसेस बाहेर पडल्या नाही. विलीनीकरणासोबतच आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता राज्यभरातील एसटी महामंडळाअंतर्गत कार्यरत कर्मचारी संपावर आहेत. आता शासनानेही कर्मचार्‍यांना मोठा दिलासा देत संपावर तोडगा म्हणून कर्मचार्‍यांच्या मूळ पगारात भरघोस वाढ करण्याची घोषणा परिवहनमंत्री अँड. अनिल परब यांनी केली आहे. सोबतच संपकर्त्या कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन ते वारंवार करीत आहेत. परंतु यानंतरही अद्यापपर्यंत संपकरी संपावर कायमच आहेत.

एसटीचा साडेनऊ कोटींचा महसूल बुडाला

नागपुरातीलही एसटीचे चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिक हे संपावर गेले. यामुळे नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकासह इतर आगारातून आजतागायत एकही बस बाहेर पडली नाही. परिणामी महामंडळाचा साडेनऊ कोटीहून अधिकचा महसूल बुडाला आहे. कर्मचार्‍यांनी संप मिटवावा यासाठी महामंडळाने निलंबनासोबतच सेवासमाप्तीच्या कारवायाही केल्यात.

आतार्यंत 348 वर कर्मचार्‍यांचे निलंबन

शनिवारी पुन्हा नागपूर विभागातील सावनेर, काटोल, उमरेड, रामटेक, इमामवाडा, घाटरोड, गणेशपेठ व वर्धमाननगर या आठ आगारातील प्रत्येकी 25 कर्मचारी अशा तब्बल 200 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता नागपूर विभागातील एकूण संपकर्त्या 348 वर कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आलं. तर आजवर 90 कंत्राटी कर्मचार्‍यांची सेवाही समाप्त करण्यात आली असल्याचं नागपूर विभाग नियंत्रक डी. सी. बेलसरे यांनी सांगितलं.

निलंबनानंतर संपकरी कर्मचारी आणखीनच संतप्त झाले. त्यांनी शासनाशी थेट आरपारच्या लढाईचा इशारा देत संप कायम ठेवला. परिणामी महामंडळाचा महसूल बुडण्यासोबतच प्रवाशांचे चांगलेच हाल होत असल्याचे चित्र आहे. तेच राज्यातील इतर आगारातून 1046 बसेसही बाहेर पडल्या असून, त्यात 17 हजार 726 वर प्रवाशांनी प्रवास केला.

हल्ली पुढारी नमस्कार सुद्धा करत नाहीत, यांच्या बापाचे काय जाते कळत नाही; अजितदादांचे जोरदार आसूड

राज्यात महाघोटाळा आघाडी, सोमय्यांचा घणाघात; 29 वा नंबर मालिकांचा असू शकतो, असा इशारा

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश