
डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर गंभीर आरोप केली जात असून संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये पीएसआयसोबत अजून एका व्यक्तीचे नाव होते. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी हातावर एक नोट लिहिली आणि त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले की, पीएसआय गोपाळ बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. संपदा मुंडे प्रकरणाला राजकीय वळण लागले असून दोन नेत्यांवर आरोप करण्यात आलीत. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांकडून सतत एसआयटीची स्थापना करण्याची मागणी केली जात असतानाच आता त्यांनी अजून काही गोष्टींबद्दल खुलासा केला. पीडित महिलेच्या वडिलांनी म्हटले की, अद्यापपर्यंत आम्हाला तपास यंत्रणेने कुठलीही माहिती दिलेली नाही.
आम्ही फक्त मीडियावर पाहतोय कुठलातरी रिपोर्ट आलाय आणि काहीतरी समोर आलंय. सखोल तपास झाला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपी फासावर लटकले पाहिजेत. राजकीय नेते येतात आम्हाला धीर देत आहेत. सरकारसोबत भांडत आहेत पण न्याय देणारं सरकार आहे सरकार काय करतंय ते बघू..शिक्षणासाठी आम्ही शैक्षणिक कर्ज काढलेलं होतं. बीडमधील एसबीआय बँकेकडून.. ते कर्ज डॉक्टर मुलगीच भरत होती.
उर्वरित कर्ज राहुल गांधींनी आम्ही भरू असा शब्द दिला आहे. तुमच्या न्यायाच्या लढाईत आम्ही सोबत राहू असाही शब्द त्यांनी दिला. पुढे बोलताना ते म्हणाले की, तिने तिच्या अर्जात बरंच काही लिहिलं आहे त्याचाही सखोल तपास झाला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. डॉक्टर महिलेच्या भावानेही यावर भाष्य केले आहे.
पीडित महिला डॉक्टरच्या भावाने म्हटले की, आम्हाला अद्याप कुठलीही माहिती तपास यंत्रणेने दिलेली नाही. महिला आयोगाने अगोदर येथे येऊन भेट घेणं गरजेचं होतं. त्यांनी न्यायाच्या बाजूने काम करावं, असं म्हटलं आहे. महिला आयोगावर थेट बोलताना पीडित महिलेचे कुटुंबिय दिसत आहेत. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर दररोज अनेक मोठे खुलासे होताना दिसत आहेत. पीडित वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या संपदा मुंडे यांना न्याय देण्यासाठी सुषमा अंधारे मैदानात उतरल्याचेही बघायला मिळतंय.