AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सजवलेला पाळणा, पाळण्यात पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडर, शिवसेनेचं मोदी सरकारविरोधात अनोखं आंदोलन

शिवसेनेच्या वतीने जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंधन दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले (ShivSena protest against Modi Government)

सजवलेला पाळणा, पाळण्यात पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडर, शिवसेनेचं मोदी सरकारविरोधात अनोखं आंदोलन
| Updated on: Feb 05, 2021 | 5:39 PM
Share

जळगाव : शिवसेनेच्या वतीने जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंधन दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. गॅस सिलिंडरसह पेट्रोल आणि डिझेलने भरलेल्या बाटल्या पाळण्यात टाकून ‘पाळणा गीत’ म्हणत इंधनदरवाढीचा निषेध करण्यात आला. आश्वासन देवून देखील इंधनदरवाढ कमी न करणाऱ्या केंद्र सरकार विरोधात हे अनोखे आंदोलन असल्याची माहिती शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिली. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला (ShivSena protest against Modi Government).

पाळणा गीत म्हणून केंद्र सरकारचा निषेध

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फुलांनी सजविलेला पाळणा आणला होता. या पाळण्यात गॅस, पेट्रोल आणि डिझेल ठेवण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘झो बाळा झो रे झो…’ असं पाळणा गीत म्हणत त्यातून इंधनदरवाढीसह केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी ‘केंद्र सरकारचे करायचे काय… खाली डोके वरती पाय…’, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

“केंद्र सरकारने देशातील महिलांच्या डोळ्यात धूर जाऊन अश्रू येवू देणार नाही, असे अश्वासन दिले होते. मात्र, गॅस, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करीत सर्वच देशवासीयांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. इंधनदरवाढ कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत”, अशी मागणीही त्यांनी केली. माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी देखील इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला (ShivSena protest against Modi Government).

हेही वाचा : महाविकास आघाडीत एकमत नाही, हे सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी देणंघेणं नाही : गिरीश महाजन

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.