AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घराणेशाहीवर वार, म्हणाले देश हाच माझा परिवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा घराणेशाहीवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा देश माझा कुटुंब आहे. काही लोकांनी कुटुंबासाठी संपत्ती जमा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घराणेशाहीवर वार, म्हणाले देश हाच माझा परिवार
संदीप राजगोळकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 04 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांनी नवीनवीन प्रचारतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे.
shailesh musale
shailesh musale | Updated on: Mar 05, 2024 | 3:36 PM
Share

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींनी श्री उज्जयिनी महाकाली मंदिरात जाऊन पूजा केलीये. यानंतर, पंतप्रधानांनी संगारेड्डीमध्ये 7200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी सभेला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, “त्यांच्यासाठी कुटुंब पहिले आहे आणि मोदींसाठी राष्ट्र पहिले आहे.”

विरोधक मला उत्तर देत नाहीत

विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भतीजावाद हा लोकशाहीला धोका आहे. घराणेशाही तरुणांच्या संधी हिरावून घेते तेव्हा ते प्रतिसाद देत नाहीत. हा विचारधारेचा लढा आहे का, असा सवाल त्यांनी सभेत उपस्थितांना केला. मोदी पुढे म्हणाले की, विरोधकांसाठी कुटुंब प्रथम आहे आणि मोदींसाठी राष्ट्र प्रथम आहे.

माझासाठी देश हाच परिवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधकांसाठी कुटुंब आधी आहे, पण माझ्यासाठी देश कुटुंब आहे. मला देशाच्या राजकारणात तरुणांना पुढे आणायचे आहे. कुटुंबवादाने देशाची लूट केली आहे, कुटुंबियांनी महागड्या भेटवस्तूंद्वारे काळा पैसा पांढरा केला आहे. पण मला मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून सरकारी तिजोरीत किंवा गंगा मातेच्या सेवेत वापरण्यात आला.”

पीएम मोदी म्हणाले की, मोदीने येथील करोडो लोकांसाठी जन धन खाती उघडली. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी काचेचा महाल बांधला पण मी स्वतःसाठी घर बांधले नाही, कुटुंबवादामुळे मी माझे कुटुंब तयार करण्यासाठी सर्व काही विकले. पण मी तुमच्यासाठी जमीन, आकाश आणि पाताळ एक करत आहे. हा परिवारवाद मोदींच्या 140 कोटींच्या कुटुंबावर प्रश्न उपस्थित करत आहे, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पंतप्रधान मोदींनी यंदा एनडीला ४०० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. अब की बार ४०० पार असा नारा त्यांनी दिली आहे. तर भाजपला ३७० जागा देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी