AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena : शिवसेना कुणाची? शिंदे आणि ठाकरेंमध्ये संघर्ष, पण निवडणूक आयोगाला दस्ताऐवज दिलेच नाहीत

Shiv Sena : दुसरीकडे शिवसेनेवर आपलाच हक्क असल्याचं दोन्ही गटाकडून सांगितलं जात आहे. त्यासाठी आरोप प्रत्यारोपही केले जात आहे. मग असं असताना दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाला कागदपत्रं का दिली गेली नाही? असा सवालही केला जात आहे.

Shiv Sena : शिवसेना कुणाची? शिंदे आणि ठाकरेंमध्ये संघर्ष, पण निवडणूक आयोगाला दस्ताऐवज दिलेच नाहीत
शिवसेना कुणाची? शिंदे आणि ठाकरेंमध्ये संघर्ष, पण निवडणूक आयोगाला दस्ताऐवज दिलेच नाहीत Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2022 | 6:41 PM
Share

मुंबई: शिवसेनेतील आमदार आणि खासदारांच्या बंडानंतर आता शिवसेना (shiv sena) कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवर आणि शिवसेनेच्या चिन्हावर दावा केला आहे. निवडणूक आयोगाकडेही (election commission) शिंदे गटाने धाव घेतली आहे. तर आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नये, असं पत्रं शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला दस्ताऐवज सादर करण्यास सांगितलं होतं. दस्ताऐवज सादर करण्याची आज शेवटची तारीख होती. पण दुपारी 2 वाजेपर्यंत दोन्ही गटाकडून कोणतीच कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची? असा सवाल केला जात आहे. मात्र, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे तूर्तास तरी शिवसेना कुणाचा? याचा फैसला होणार नाहीये.

शिवसेना आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा सांगण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिंदे आणि शिवसेना गटाने थोडी कागदपत्रे सादर केली होती. संपूर्ण कागदपत्रे सादर करण्याची आज दुपारी 2 वाजेपर्यंतची मुदत होती. मात्र, तोपर्यंत दोन्ही गटाकडून काहीच कागदपत्रे सादर केली गेली नाही. त्यामुळे शिवसेना कुणाची असा सवाल केला जात आहे.

निवडणूक आयोग काय करणार?

दोन्ही गटाने डेडलाईन संपली तरी कागदपत्रं सादर केली नाहीत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाचं पुढचं पाऊल काय असेल असा सवाल केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोर्टातील प्रकरण संपेपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाला तूर्तास वेट अँड वॉचच्या भूमिकेत जावं लागणार आहे.

मग कागदपत्रं देण्यात उशीर का?

दुसरीकडे शिवसेनेवर आपलाच हक्क असल्याचं दोन्ही गटाकडून सांगितलं जात आहे. त्यासाठी आरोप प्रत्यारोपही केले जात आहे. मग असं असताना दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाला कागदपत्रं का दिली गेली नाही? असा सवालही केला जात आहे. तसेच या मुद्द्यावर अजूनही दोन्ही गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कोणती कागदपत्रे द्यायची होती?

आज दोन्ही गटाला निवडणूक आयोगाकडे महत्त्वाची कागदपत्रे द्यायची होती. त्यात पक्षांतर्गत निवडणुकीचा इतिहास, नेत्यांना देण्यात आलेली जबाबदारी, पक्षाचं संविधान, तसेच पक्षाचं संविधान काय सांगतं याचा विस्तृत अहवाल, पक्षाच्या विविध शाखांची रचना, त्यातील सदस्यांची संख्या आणि त्यांचा पाठिंबा असल्याचे पुरावे आदी कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करायचे होते. पण कोणत्याही गटाने ही कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला कागदपत्रे देण्यासाठी मुदतवाढ मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला