Chandrapur Rain Update : चंद्रपुरात पावसाचा कहर, घरांमध्ये पाणी शिरलं…
चंद्रपूर (Chandrapur) शहरातल्या रहमत नगर (rahamat nagar) भागात इरई नदीचे (Irai Nadi) पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. जवळपास 60 ते 70 घरात नदीचे पाणी शिरले. इरई धरणाचे सर्व म्हणजे 7 दारे 1 मीटरने उघडल्याने इरई नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त […]
चंद्रपूर (Chandrapur) शहरातल्या रहमत नगर (rahamat nagar) भागात इरई नदीचे (Irai Nadi) पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. जवळपास 60 ते 70 घरात नदीचे पाणी शिरले. इरई धरणाचे सर्व म्हणजे 7 दारे 1 मीटरने उघडल्याने इरई नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इरई धरणाच्या कॅचमेंट एरिया म्हणजे चिमूर-चारगाव बंधारा क्षेत्रात मुसळधार पावसाने धरणात पाण्याची महत्तम आवक होतेय. इरई नदीच्या पात्रालागत वास्तव्याला असलेल्या नागरिक व शेतकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. धरणातून 490 क्युमेंक्स प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होतोय.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

