SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7:30 AM | 30 September 2022 -TV9

मुंबई महानगर पालिकेतंर्गत आता मराठी पाट्या लावण्याच्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या पासून जे पाट्या लावणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Sep 30, 2022 | 9:17 AM

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदतीची घोषणा केली आहे. यातंर्गत 755 कोटींची मदत करण्यात येणार आहे. तर मुंबई महानगर पालिकेतंर्गत आता मराठी पाट्या लावण्याच्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या पासून जे पाट्या लावणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तर गोंदिया जिल्ह्यात थंडीने चाहुल दिली आहे. येथे धुक्याची चादर पसरली आहे. तर नाशिक महापालिकेवर ऑक्टोंबर महिन्यात बोजा वाढला आहे. ऑक्टोंबरमध्ये पालिकेवर आणखी 100 कोटींचा भार पडणार आहे. तर प. रेल्वेवर एसी लोकलच्या 31 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्चला होणाऱ्या 12 वीच्या परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून फार्म भरता येणार. तर नियमित शुल्कासह 21 ऑक्टोंबर हे फार्म भरता येणार आहेत.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें