AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाची धाकधुक वाढली! युद्धविरामासाठी इराणची मोठी अट, डोनाल्ड ट्रम्प यांची लागणार वाट, थेट..

28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले. मात्र, इराण अजूनही युद्धात खंबीरपणे उभा असल्याचे बघायला मिळत आहे. या युद्धामुळे जग संकटात आहे. इराणकडून युद्धात मोठी अट ठेवण्यात आली.

जगाची धाकधुक वाढली! युद्धविरामासाठी इराणची मोठी अट, डोनाल्ड ट्रम्प यांची लागणार वाट, थेट..
donald trump mojtaba khamenei
| Updated on: Apr 09, 2026 | 9:51 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात सुरूवातीपासूनच पाकिस्तानची मोठी लुडबुड वाढल्याचे बघायला मिळाले. इराणकडून पाकिस्तानची मध्यस्थी नाकारण्यात आली. पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या विषयात इस्त्रायलनेही पाकिस्तानला टोकले. पण अमेरिका पाकिस्तानला पुढे घालताना दिसत आहे. पाकिस्तानला गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेची चपरासगिरी करताना दिसते. आता अमेरिकेची ढाल बनण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. पाकिस्तान स्वत: दहशतवादाला सपोर्ट करतो, तो पाकिस्तान युद्धात मध्यस्थी करताना दिसत आहे. आता स्थिती भयंकर होताना दिसत आहे. अमेरिका आणि इराणकडून दोन आठवड्यांकरिता युद्धबंदी लागू करण्यात आली. इस्लामाबाद येथे युद्धबंदी कराराची बैठक आयोजित करण्यात आली. मात्र, या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी इराणकडून काही अट घालण्यात आल्या. जर त्या अटी मान्य झाल्या तरच इराण या बैठकीत सहभागी होणार आहे.

अमेरिकेसोबत शस्त्रसंधी करार झालेला असताना देखील इस्त्रायलकडून लेबनॉनमध्ये सातत्याने हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांवर बोलताना स्पष्टपणे इराणकडून सांगण्यात आले की, लेबनॉनवरील हल्ले तात्काळ थांबवा. अन्यथा शस्त्रसंधी रद्द केली जाईल. इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे अगोदरच इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. आता पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे.

बेल्जियमचे परराष्ट्र मंत्री मॅक्सिम प्रेव्होट यांनी लेबनॉनवरील इस्रायली हल्ले थांबवण्याचे आवाहन केले. इराण-अमेरिका शस्त्रसंधी लेबनॉनलाही लागू झाली पाहिजे यावर जोर दिला आहे. इराणकडूनही युद्धबंदी करार करण्याकरिता हीच मोठी अट ठेवण्यात आली. कारण त्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत लेबनॉनवरील हल्ले थांबवली जाणार नाहीत, तोवर बैठकीत सहभागी होणार नाहीत.

इराणवर मोठे हल्ले करण्यात आल्याने मोठे नुकसान झाले. मात्र, तरीही इराण युद्धात एका मजबूत स्थितीत बघायला मिळत आहे. इराणच्या मदतीला या युद्धात काही देश धावून आले. पण अमेरिकेच्या मदतीला एकही देश पुढे आला नाही. युद्धादरम्यान होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. आपल्या मित्र देशांकरिता त्यांनी होर्मुज खाडी सुरू ठेवली. भारताचे काही जहाज होर्मुज खाडीतून सोडण्यात आली.

Follow Us
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!