हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीच्या हातावर… फलटण प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट, पोस्टमार्टम…
Phaltan Doctor Case : फलटण येथील महिला डॉक्टर वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर गंभीर आरोप केली जात आहेत. संपदा मुंडे यांनी हातावर एक नोट लिहित आयुष्याचा शेवट केला. आता या प्रकरणात खळबळजनक खुलासा करण्यात आलाय.

फलटणच्या वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन आरोपींची नावे आपल्या तळहातावर लिहिली, आरोपी पीएसआय बदने याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचेही त्यांनी स्पष्ट लिहिले. या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या देखील अडचणीत सापडल्या आहेत. एका माजी खासदाराचेही नाव या प्रकरणात आलंय. आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांना पोलिसांनी अटक केलीये. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी त्यांना सुनावण्यात आली.
यादरम्यान आरोपी पीएसआय गोपाळ बदनेच्या वकिलांनी कोर्टात खळबळजनक दावा केला. आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना सहकार्य करत नसून त्याची चाैकशी करण्यासाठी 5 दिवसांची पोलिस कोठडी हवी असल्याचे कोर्टात सरकारी वकिलांनी पोलिसांची बाजू मांडताना म्हटले. याला जोरदार विरोध आरोपीचे वकील राहुल धायगुडे यांनी केला. यादरम्यान त्यांनी हैराण करणारा दावा युक्तीवादादरम्यान केला.
आरोपीची वकील धायगुडे यांनी म्हटले की, मुळात म्हणजे हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीच्या हातावर कोणतीही सुसाईड नोट नव्हती. मात्र, पोस्टमार्टम रूममध्ये हातावर सुसाईट नोट दिसून आली जे धक्कादायक आहे. हे कसे शक्य आहे? सर्वात विशेष म्हणजे महिलेच्या कुटुंबियांनीच सांगितले की, नोटमधील हस्ताक्षर तिचे नाहीये. मग पोलिसांनी आरोपींना कोणत्या आधारावर अटक केली? आता आरोपींच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानंतर प्रकरणाला वेगळेच वळण आलंय.
मुळात म्हणजे संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे प्रकरण वेगळे असून काहीतरी वेगळे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. फक्त हेच नाही तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचेही सांगितले जातंय. फलटण शहरात रूम असताना संपदा मुंडेने हॉटेलमध्ये जाऊन जीव दिल्याने चर्चांना अधिकच उधाण आल्याचे बघायला मिळतंय. संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी बीड जिल्ह्यात विविध प्रकारची आंदोलन केली जात आहेत. अत्यंत गरीब घरातून संपदा मुंडे होत्या, संपदा मुंडेंची शैक्षणिक कर्ज भरण्याचे वजन राहुल गांधींनी दिले आहे.
