AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर आज संपदा मुंडे आपल्यात असत्या… डॉक्टर तरूणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर संतापले लक्ष्मण हाके, म्हणाले..

Satara Doctor Death : फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. दोन आरोपींना कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

तर आज संपदा मुंडे आपल्यात असत्या... डॉक्टर तरूणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर संतापले लक्ष्मण हाके, म्हणाले..
Laxman Hake Devendra Fadnavis Sampada Munde case
| Updated on: Oct 27, 2025 | 7:26 AM
Share

फलटण येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या संपदा मुंडे यांनी एक नोट हातावर लिहून आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने याने तब्बल चार वेळा संपदा मुंडे यांच्यावर बलात्कार केला. पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याने शारिरीक आणि मानसिक त्रास दिल्याचे तळहातावरील नोटमध्ये संपदा मुंडे यांनी स्पष्टपणे म्हटले. हेच नाही तर एका खासदारावरही गंभीर आरोप झाला. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणात एसआयटीची स्थापना करावी, अशी मागणी केली जातंय. मात्र, तशा हालचाली बघायला मिळत नाहीत. बीड जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी संपदा मुंडे हिच्या आई-वडिलांची भेट घेतली. आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांना मोठा प्रश्न विचारलाय.

लक्ष्मण हाके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मुख्यमंत्री महोदय, सप्रेम नमस्कार.. डॉ संपदाला न्याय भेटेल का हो ? असा थेट प्रश्न सुरूवातीलाच विचारला. पुढे लक्ष्मण हाके यांनी लिहिले की, महोदय आपण महाराष्ट्रात रहात असल्याची चीड यायला लागलीय. आपली मुलगी सुरक्षित आहे का?, सुरक्षित राहिल का आणि वसतिगृहात तिला ठेवणे कितपत योग्य या सारख्या असंख्य प्रश्नांनी लेकीचा बाप चिंताग्रस्त आहे. डॉक्टर संपदा तर गेली, तिने आत्महत्त्या केली की तिचा नराधमांनी गळा घोटला याचे उत्तर मिळायला अवधी आहे.

पुढे लक्ष्मण हाके लिहितात की, ज्या फलटणमधील पोलीस डिपार्टमेंट आणि राजकारणी लोकांवर संशयाची सुई आहे त्याच फलटणमध्ये तुम्ही आलात आणि त्याच फलटणमध्ये पुढाऱ्यांना क्लीनचीट दिलीत. महाराष्ट्रातील माता भगिनीच्या मनात प्रचंड संताप निर्माण झालाय, कोण तो खासदार त्याने ऊसतोड मजूराना गुलाम समजून स्वराज चालवला आहे, दहा लाख ऊसतोड मजूरांना या महाराष्ट्रात माणूस म्हणून कायदा नाही असा माझा गृह विभागावर आरोप आहे.

कारखाण्याची धुराडी पेटण्याच्या अगोदर ऊसतोड मुकादम -मजूर यांचे अपहरण मारहाण त्याचे सातबारे यांचं काय काय होतं हा संशोधनाचा विषय आहे. आज डॉ संपदा चा बळी गेला, सध्याच्या घडीला एसआयटी स्थापना होणं गरजेचं आहे. सुसाईड नोट म्हणून हातावर लिहलेलं हस्तक्षर त्यांचं आहे का? यावर प्रश्न चिन्ह आहे. पीएसआय गोपाळ बदने यांच्याविरोधात फलटणच्या डीएसपींकडे लेखी तक्रार करुनही कारवाई झाली नाही आणि ती कारवाई झाली असती तर डॉ. संपदा मुंडे आज आपल्यात असत्या.

संपदा मुंडेंवर आत्महत्येची वेळ आली ती अधिकाऱ्यांमुळे. या परिस्थितीला जन्म देण्यास कारणीभूत जी नेते मंडळी आहेत ते मोकाटच फिरणार आहेत का? प्रत्येक वेळी तुम्ही राजकारण करणार आहात का? अश्या लोकांना पाठीशी घालणार आहात का याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागणार आहे, असे हाकेंनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, ते मिळणार नसेल तर महाराष्ट्रात डॉ संपदाला न्याय भेटेपर्यंत जनआंदोलन उभं करावे लागेल.

डॉ संपदा प्रकरण संवेदनशील असताना आपलं राजकारण महाराष्ट्राला आवडलं नाही, मुख्यमंत्री महोदय तुम्ही सुज्ञ आहात प्रत्येक गोष्टीत राजकारण आपण का कराव, आरोपीच्या म्हुसक्या आवळणे आवश्यक आहे.  महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेल्याची भावना जनतेत आहे, असेही लक्ष्मण हाकेंनी म्हटले. एकप्रकारे या

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.