
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारोहानिमित्त देशातील विविध शहरांमध्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भात मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या कामाबद्दल वक्तव्य केलं. शिवाय संघाचा मूळ हेतू काय आणि विरोध होत असताना संघाचं कामकाज कसं चालतं… याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, मुस्लिम समाजात संघाचं काम कसं चालतं… याबद्द मोहन भागवत नेमकं काय म्हणाले जाणून घेवू…
संघाचे विचार सांगत मोहन भागवत म्हणाले, ‘जेव्हा कोणतीही गोष्ट दोन्हीकडून होते तेव्हाच त्याला यश येतं. तुम्ही विरोध केला मीही विरोध केला तर विरोधच निर्माण होतो. तथागत बुद्धावर एका व्यक्तीने टीका केली. बुद्ध काहीच बोलले नाही. शांत होते. तो म्हणाला, मी तुमच्यावर एवढा रागावतो तरीही तुम्हाला राग येत नाही? त्यावर बुद्ध म्हणाले, मी तुला एखादी गोष्ट दिली. तुम्ही नाही घेतली तर ती गोष्ट कुणाच्या जवळ राहील? तो म्हणाला, तुमच्याजवळ राहील. त्यावर बुद्ध म्हणाले, तू एवढ्या शिव्या दिल्या, त्या मी घेतल्याच नाही. त्यामुळे राग येण्याचं कारण काय? त्यामुळे कोण काय बोलत आहे, त्यावर लक्ष न देता फक्त आपव्या हेतूकडे लक्ष द्यायचं… असं मोहन भागवत यांनी यावेळी सांगितलं…
पुढे मोहन भागवत म्हणाले, ‘त्यामुळे स्वयंसेवक काम करायला जातात तेव्हा या गोष्टींचा विचार करूनच जातात. विरोध करणारे आपलेच आहेत, हे त्यांना माहीत आहे. पूर्वी अन्याय झाले. तेव्हा प्रतिबंध हटवल्यानंतर गुरुजी म्हणाले, चुकूनही दातांना जीभ फुटते. कापली जाते. त्यामुळे कोणी आपले दात नाही तोडत. त्यामुळे जे झालं ते झालं. आपलाच समाज आहे. आणीबाणीनंतर बाळासाहेब देवरस म्हणाले, ‘फर्गेट अँड फॉरगिव्ह…’ कारण समाज आपलाच आहे. त्यामुळे या गोष्टीची आम्ही चिंता करत नाही.’
आधी विरोध होतो. पण जेव्हा प्रतिक्रियाच देत नाही, तेव्हा असं लक्षात येतं, तेव्हा विरोध करणारे ऐकू लागतात. ऐकल्यावर त्याची पडताळणी करतात. त्यानंतर त्यांना त्यात तथ्य वाटतं. त्यानंतर ते आमचे होतात. हीच आमची प्रक्रिया आहे. स्वयंसेवक मुस्लिमांमध्ये देखील काम करत आहेत. विरोधानंतरही मुस्लिम समाजात संघाचं काम असंच चालतं… असं देखील भागवत म्हणाले.