AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला आयोगाने अगोदर येथे भेट घेणं गरजेचं होत… महिला डॉक्टरच्या कुटुंबियांचा आरोप, म्हणाले, तपास यंत्रणेने..

Satara Doctor Case : फलटणच्या उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या महिला डॉक्टराने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली. आता पीडितेच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केली आहेत.

महिला आयोगाने अगोदर येथे भेट घेणं गरजेचं होत... महिला डॉक्टरच्या कुटुंबियांचा आरोप, म्हणाले, तपास यंत्रणेने..
female doctor death case
| Updated on: Oct 30, 2025 | 1:23 PM
Share

डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर गंभीर आरोप केली जात असून संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये पीएसआयसोबत अजून एका व्यक्तीचे नाव होते. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी हातावर एक नोट लिहिली आणि त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले की, पीएसआय गोपाळ बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. संपदा मुंडे प्रकरणाला राजकीय वळण लागले असून दोन नेत्यांवर आरोप करण्यात आलीत. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांकडून सतत एसआयटीची स्थापना करण्याची मागणी केली जात असतानाच आता त्यांनी अजून काही गोष्टींबद्दल खुलासा केला. पीडित महिलेच्या वडिलांनी म्हटले की, अद्यापपर्यंत आम्हाला तपास यंत्रणेने कुठलीही माहिती दिलेली नाही.

आम्ही फक्त मीडियावर पाहतोय कुठलातरी रिपोर्ट आलाय आणि काहीतरी समोर आलंय. सखोल तपास झाला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपी फासावर लटकले पाहिजेत. राजकीय नेते येतात आम्हाला धीर देत आहेत‌. सरकारसोबत भांडत आहेत पण न्याय देणारं सरकार आहे सरकार काय करतंय ते बघू..शिक्षणासाठी आम्ही शैक्षणिक कर्ज काढलेलं होतं. बीडमधील एसबीआय बँकेकडून.. ते कर्ज डॉक्टर मुलगीच भरत होती.

उर्वरित कर्ज राहुल गांधींनी आम्ही भरू असा शब्द दिला आहे. तुमच्या न्यायाच्या लढाईत आम्ही सोबत राहू असाही शब्द त्यांनी दिला. पुढे बोलताना ते म्हणाले की, तिने तिच्या अर्जात बरंच काही लिहिलं आहे त्याचाही सखोल तपास झाला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. डॉक्टर महिलेच्या भावानेही यावर भाष्य केले आहे.

पीडित महिला डॉक्टरच्या भावाने म्हटले की, आम्हाला अद्याप कुठलीही माहिती तपास यंत्रणेने दिलेली नाही. महिला आयोगाने अगोदर येथे येऊन भेट घेणं गरजेचं होतं. त्यांनी न्यायाच्या बाजूने काम करावं, असं म्हटलं आहे. महिला आयोगावर थेट बोलताना पीडित महिलेचे कुटुंबिय दिसत आहेत. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर दररोज अनेक मोठे खुलासे होताना दिसत आहेत. पीडित वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या संपदा मुंडे यांना न्याय देण्यासाठी सुषमा अंधारे मैदानात उतरल्याचेही बघायला मिळतंय.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.