AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

weather forecast : पुढचे दोन दिवस महाराष्ट्रावर ट्रिपल संकट, घराबाहेर पडूच नका, या जिल्ह्यांना IMD चा हाय अलर्ट

राज्याला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसणार आहे, हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

weather forecast : पुढचे दोन दिवस महाराष्ट्रावर ट्रिपल संकट, घराबाहेर पडूच नका, या जिल्ह्यांना IMD चा हाय अलर्ट
Weather ForecastImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 6:46 PM
Share

वातावरणामध्ये अचानक मोठा बदल पहायला मिळत आहे. राज्यात पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे. दरम्यान राज्यात जरी हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी देखील राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

विदर्भात पावसाचा इशारा   

पुढील दोन दिवस भारतीय हवामान विभागाकडून विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर,अमरावती, यवतमाळ अकोला, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. याच काळात वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा देखील सुटणार आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान मागील दोन दिवसांपासून  विदर्भात अवकाळी पाऊस सुरू असल्याने नागरिकांना काही प्रमाणात का होत नाही, उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, अता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यावर ट्रीपल संकट 

दरम्यान हवामान विभागाकडून महाराष्ट्रात केवळ पावसाचाच इशारा देण्यात आलेला नाहीये, तर सोबतच वादळी वारा आणि विजांचा कडकटात असं दुहेरी संकट देखील असणार आहे. त्यात भरीसभर म्हणजे काही भागांमध्ये उष्णता कायम राहणार आहे. वीज, वारा आणि पाऊस सोबतच काही भागांमध्ये उष्णता असं ट्रीपल संकट या काळात राज्यावर असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

वाशिममध्ये पावसाची हजेरी 

वाशिम शहरासह तालुक्यातील काही भागांत आज दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

नागपूरमध्ये सोसाट्याचा वारा 

नागपूर शहरात सोसाट्याच्या वारा सुरू आहे.  दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झालं आहे, नागपूर शहराला पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नांदेडमध्ये पाऊस 

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, कंधार या तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढल आहे, मुदखेड, कंधार तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन या तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. काल देखील नांदेड जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.

नंदुरबारमध्येही अवकाळीची हजेरी  

नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. थंड हवेचे ठिकाण आलेले तोरणमाळ आणि देवगोई घाटात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील आमचूल उद्योगाला फटका बसण्याची शक्यता आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?